पंतप्रधान नरेंद्र मोदी हे २२ मे रोजी देशभरातील पुनर्विकसित करण्यात आलेल्या १०३ रेल्वे स्थानकांचे व्हर्च्युअल उद्घाटन करणार आहेत. यामध्ये मध्य रेल्वेच्या अखत्यारीतील १२ स्थानकांचा समावेश आहे, जे फक्त १५ महिन्यांमध्ये अत्याधुनिक सुविधांसह पुनर्विकसित करण्यात आले आहेत. या कामांवर एकूण १३८ कोटी रुपयांपेक्षा अधिक खर्च झाला आहे.
केंद्र सरकारच्या ‘अमृत भारत स्टेशन योजना’अंतर्गत ही कामे करण्यात आली आहेत. या कामांना डिसेंबर २०२२ मध्ये सुरूवात करण्यात आली होती. या योजनेचा उद्देश रेल्वे स्थानकांना भविष्यासाठी तयार, मल्टी-मोडल ट्रान्सपोर्ट हबमध्ये रूपांतरित करणे आहे, ज्यामध्ये दिव्यांगांसाठी विशेष सुविधा, शाश्वत विकास आणि शहरी एकत्रीकरणाला प्राधान्य देण्यात आले आहे.

अनेक सुविधा विकसित करण्यात आल्या
मध्य रेल्वेतील ज्या १२ स्थानकांचे उद्घाटन होणार आहे, त्यामध्ये मुंबई विभागातील चिंचपोकळी, परळ, वडाळा रोड आणि माटुंगा ही महत्त्वाची स्थानके आहेत. या स्थानकांवर प्रवाशांसाठी प्लॅटफॉर्म फ्लोरिंग, एलिवेटेड बुकिंग ऑफिस, आधुनिक स्वच्छतागृह ब्लॉक, वर्टिकल गार्डन, COP, FOB सौंदर्यीकरण आणि टिकाऊ छप्पर अशा सुविधा विकसित करण्यात आल्या आहेत.
प्रमुख स्टेशन आणि त्यावर करण्यात आलेली कामे
चिंचपोकळी स्टेशन
खर्च – ११.८१ कोटी रु.
प्लॅटफॉर्म पुनर्निर्माण, वॉटर बूथ, वर्टिकल गार्डन, FOB प्रवेशद्वारावर छत्री आणि सुंदर पेंटिंगचे काम.
परळ स्टेशन
खर्च – १९.४१ कोटी रु.
नवीन स्टेशन भवन, टेन्साइल रूफ, STP असलेले स्वच्छतागृह, बागकाम आणि सर्क्युलेटिंग एरियामधील विकास.
वडाळा रोड स्टेशन
खर्च – २३.०२ कोटी रु.
प्लॅटफॉर्म फ्लोरिंग, COP दुरुस्ती, FOB सौंदर्यीकरण, आणि आधुनिक स्वच्छतागृह ब्लॉकचे बांधकाम.
माटुंगा स्टेशन
खर्च – १७.२८ कोटी रु.
देशातील पहिले महिलांनी चालवलेले स्टेशन आधुनिक सुविधांनी सज्ज
भारतातील पहिले पूर्णपणे महिला चालवत असलेले स्टेशन आता आणखी आधुनिक सुविधांनी सुसज्ज झाले आहे. महाराष्ट्रातील एकूण १३२ स्टेशन अमृत भारत योजनेत समाविष्ट करण्यात आले असून त्यापैकी पहिल्या टप्प्यात १८ स्टेशन्सचे उद्घाटन करण्यात येणार आहे. रेल्वे अधिकाऱ्यांचा असा दावा आहे, की ही योजना प्रवाशांना उत्कृष्ट अनुभव देण्याचे, स्टेशन स्मार्ट आणि पर्यावरणपूरक बनवण्याचे तसेच रेल्वेला शहरांच्या जीवनरेषेप्रमाणे अधिक मजबूत करण्याच्या दृष्टीने एक क्रांतिकारक पाऊल आहे.











