पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्या नवी मुंबई विमानतळाच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन होणार

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते बुधवारी 8 ऑक्टोबर रोजी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन होत आहे. नवी मुंबईच्या विकासाला या विमानतळामुळे मोठी चालना मिळणार आहे.

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ ऑक्टोबर महिन्याच्या सुरूवातीला उद्घाटनासाठी सज्ज झाले आहे. उद्या बुधवार 08 ऑक्टोबर रोजी उद्घाटन होणार असल्याची माहिती समोर आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते हा कार्यक्रम पार पडणार आहे. हे केवळ एक नवीन एअरपोर्ट नसून, मुंबईच्या विमान वाहतूक क्षेत्रासाठी एक महत्त्वाकांक्षी पाऊल आहे. जागतिक दर्जाच्या सुविधा आणि प्रवाशांसाठी सोयीस्कर ‘जुळ्या विमानतळांच्या’ मॉडेलमुळे, हे एअरपोर्ट क्षमता, कनेक्टिव्हिटी आणि सोयीच्या बाबतीत जगातील दुबई, लंडन आणि न्यूयॉर्कसारख्या सर्वोत्तम विमातळांच्या यादीत याचा समावेश होणार आहे.

विमानतळाच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या पहिल्या टप्प्याचे बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. पनवेलजवळील उलवे परिसरात उभारलेले हे अत्याधुनिक विमानतळ मुंबई आणि आसपासच्या जिल्ह्यांसाठी अतिशय महत्त्वाचे ठरणार आहे. या विमानतळामुळे मुंबई विमानतळावरील ताण कमी होणार असून ठाणे, रायगड, पालघर आणि वसई-विरारसारख्या भागांना जागतिक प्रवासाच्या नकाशावर आणखी कनेक्टिव्हिटी मिळणार आहे. या विमानतळापर्यंत मुंबई, ठाणे, रायगड आणि वसई-विरार, कल्याण, डोंबिवली, अंबरनात आणि बदलापूरहून सहज पोहोचता येणार आहे.

या मार्गाने प्रवास करणाऱ्यांना जेव्हीएलआर (JVLR), त्यानंतर पूर्व द्रुतगती महामार्ग आणि वाशी खाडी पुलावरून उलवेमार्गे विमानतळ गाठावे लागेल. अंदाजे 40 ते 45 किमी चा हा प्रवास पूर्ण करण्यासाठी दीड तासाहून अधिक वेळ लागण्याची शक्यता आहे. वरळी, दक्षिण मुंबईतून येणाऱ्यांसाठी अटल सेतू हा उत्तम पर्याय आहे. अटल सेतूवरून थेट उलवे-बेलापूरमार्गे विमानतळ 1 तासात गाठता येईल. हा सर्वात कमी वेळेचा मार्ग असून, अंदाजे 34 ते 35 किमी इतका आहे.

नवी मुंबई विमानतळाच्या पहिल्या टप्प्याच्या उद्घाटनानंतर पुढील टप्प्यात मेट्रो लाइन 8 ही मुंबई विमानतळ आणि नवी मुंबई विमानतळाला थेट जोडणार आहे. तसेच, मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाचे कामही वेगाने सुरू आहे. भविष्यात भूमिगत स्थानक, जलमार्ग सेवा आणि रिंग रोड कनेक्टिव्हिटी सुरू करण्याचा सरकारचा विचार आहे.

प्रवाशांसाठी अनेक सोयी आणि सुविधा

अधिकाऱ्यांनी खुलासा केला आहे की पहिल्या टप्प्यात विमानतळावर एक धावपट्टी आणि एक टर्मिनल असेल. विमानतळाची क्षमता दरवर्षी २ कोटी प्रवाशांना हाताळण्याची असेल. इंडिगो, अकासा एअर आणि एअर इंडिया एक्सप्रेस सारख्या अनेक एअरलाइन सहयोगी कंपन्यांनी नवी मुंबई विमानतळावरून देशांतर्गत उड्डाणे चालविण्यास रस दर्शविला आहे.  देशांतर्गत उड्डाणे सुरू झाल्यानंतर काही महिन्यांनी, तात्पुरत्या स्वरूपात २०२६ च्या सुरुवातीला आंतरराष्ट्रीय उड्डाणे सुरू होण्याची शक्यता आहे.

  • नवी मुंबई विमानतळाचे बांधकाम पाच टप्प्यात करण्याचे नियोजन आहे. अधिकाऱ्यांच्या मते, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाची अंतिम क्षमता दरवर्षी ९० दशलक्ष प्रवाशांची असेल.
  • विमानतळावर अति-जलद सामान हाताळणी प्रणालीचे एक उल्लेखनीय वैशिष्ट्य असेल. वाढीव वेग आणि अचूकतेसाठी ही प्रणाली ३६०-अंश बारकोड स्कॅनिंग वापरेल.
  • सामान्य माल, औषध आणि नाशवंत वस्तूंसाठी एक नवीन विशेष एअर कार्गो टर्मिनल बांधले जात आहे. टर्मिनलमध्ये तापमान-नियंत्रित गोदामे आणि उच्च-तंत्रज्ञान स्वयंचलित हाताळणी प्रणालींचा समावेश असेल, ज्यामुळे एनएमआयए पश्चिम आणि मध्य भारतासाठी एक प्रमुख मालवाहतूक प्रवेशद्वार बनेल.

About Author

Rohit Shinde

Other Latest News