मुंबईच्या लालबागचा राजा गणपती मंडळानंतर आता शिर्डीचा साईबाबाही अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीला धावून आला आहे. साईबाबा संस्थानकडून (Shirdi Saibaba Sansthan) अतिवृष्टी बाधितांच्या मदतीसाठी 5 कोटी रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. ही मदत मुख्यमंत्री सहाय्यात निधीत जमा केली जाईल.. साईबाबा संस्थानाच्या या बांधीलकीचे सर्वत्र कौतुक होत आहे.
यापूर्वी 1 कोटींची मदत – Shirdi Saibaba Sansthan
शिर्डी संस्थानने यापूर्वी अतिवृष्टी ग्रस्त शेतकऱ्यांसाठी 1 कोटी रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली होती. आता यानंतर आणखी 4 कोटी अशी एकूण 5 कोटी रुपयांची आर्थिक मदत संस्थांकडून जाहीर करण्यात आली आहे. 5 कोटी रुपयांचा प्रस्ताव मान्यतेसाठी उच्च न्यायालयाकडे पाठवला आहे. कारण 50 लाख रुपयांवरील खर्चासाठी साई संस्थानला उच्च न्यायालयाची परवानगी बंधनकारक असते. याच्या आधी सुद्धा देशात जेव्हा जेव्हा संकट आलं तेव्हा तेव्हा साईबाबा संस्थाकडून भरघोस मदत दिली गेली आहे. आता आपल्या महाराष्ट्रातीलच शेतकरी अडचणीत आल्यानंतर त्याच्या मदतीसाठी शिर्डी साईबाबा संस्थाने आपली बांधिलकी जपली आहे. Shirdi Saibaba Sansthan

यापूर्वी लालबागच्या राजाकडून 50 लाखांची मदत
यापूर्वी मुंबईतील लालबागचा राजाही अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी धावून आला आहे. लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाकडून शेतकऱ्यांसाठी 50 लाख रुपयांची आर्थिक मदत करण्यात आली आहे. Shirdi Saibaba Sansthan
दरम्यान, विविध सामाजिक संघटनांकडून मुख्यमंत्री सहायता निधीत अतिवृष्टीबाधितांच्या मदतीसाठी पैसे जमा करण्याचं आवाहन केलं जातं आहे. राज्यातील सर्व शिक्षक आपला एक दिवसाचा पगार पूरग्रस्तांच्या मदतीसाठी देणार आहेत. अनेक आमदार खासदार आणि मंत्री सुद्धा आपला एक महिन्याचा पगार पूरग्रस्तांना देत आहेत. याशिवाय महाराष्ट्र सरकारने सुद्धा 2200 कोटी रुपयांचा आर्थिक पॅकेज जाहीर केल आहे.. तसेच अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांच्या मदतीतला मोठा अडथळा सरकारच्या वतीने दूर करण्यात आला आहे. सरकार कडून ई केवायसीची अट शिथिल करण्यात आली आहे. दिवाळीपर्यंत सर्व अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या बँक खात्यात नुकसान भरपाईचे पैसे जमा होतील असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे.











