महाराष्ट्रातील पावसाबाबत आता हवामान विभागाकडून खरंतर मोठी अपडेट समोर आली आहे. 31 ऑक्टोबर रोजीही राज्यातील विविध भागांत पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांत वादळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. राज्यातील 13 जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळे राज्यावरील पावसाचे सावट पुढील किमान आठवडाभर कायम राहण्याची शक्यता आहे.
पावसाचे सावट अद्याप कायम
पूर्व मध्य अरबी समुद्र आणि पूर्व विदर्भ, दक्षिण छत्तीसगड आणि आसपासच्या परिसरात कमी दाबाचं क्षेत्र तयार झालं आहे. त्यामुळे हवामानात मोठे बदल झाले आहेत. पहाटेपासून पावसाला सुरुवात झाली आहे. 31 ऑक्टोबर रोजी विदर्भ आणि मराठवाड्यात पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मागच्या 24 तासांत विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि तळ कोकणात पावसाची नोंद करण्यात आली आहे. वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाने पिकांचं नुकसान झालं. मालवण, विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये जास्त पावसाची नोंद करण्यात आली आहे. तसेच पश्चिम महाराष्ट्राच्या काही भागात देखील पावसाचे चित्र कायम असल्याची स्थितीत सध्या पाहायला मिळत आहे.

गुजरातच्या दिशेनं देखील डिप डिप्रेशन येत आहे. त्यामुळे वादळी वारे वेगाने सुटले आहेत. पुढचे 36 तास महत्त्वाचे असणार आहेत. महाराष्ट्र आणि गुजरातला अलर्ट देण्यात आला आहे. 3 नोव्हेंबर ते 5 नोव्हेंबर पुन्हा उत्तरेकडे सायक्लोनिक सर्क्युलेशन तयार होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुढचे 48 तास पावसाचे असणार आहेत. दरम्यान, यावरून स्पष्ट होते की राज्यातील पाऊस पूर्णपणे उघडीप देण्यास आणखी एक आठवडा लागेल, म्हणजेच 5 नोव्हेंबरपर्यंत पाऊस पूर्णपणे उघडीप देण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्र, गुजरातला पावसाचा इशारा
रब्बी हंगामावर संकट, शेतकरी चिंतेत
सततच्या पावसाळी आणि ढगाळ वातावरणामुळे राज्यातील रब्बीचा हंगाम देखील मागास होण्याची चिन्हे सध्या दिसत आहेत. दरम्यान नैऋत्य मान्सून राज्यातून पूर्णपणे माघारी फिरला आहे. तयार झालेल्या पोषक हवामानामुळे राज्यामध्ये काही जिल्ह्यांमध्ये हलक्यातील मध्यम सरींची शक्यता हवामाना विभाग आणि आगामी काळामध्ये वर्तवली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी हवामानाचा अंदाज लक्षात घेऊन शेती कामाचे नियोजन करावे असं आवाहन देखील करण्यात आला आहे. शेतकरी सध्या चिंतेत आहेत.











