MP Breaking News
Sun, Dec 14, 2025

गिरीश महाजन आणि एकनाथ खडसे यांच्यातला वाद का गेला विकोपाला? काय आहे पार्श्वभूमी?

Written by:Smita Gangurde
एकनाथ खडसेंना राजीनामा द्यावा लागल्यापासून गेल्या दशकभरात महाजन विरुद्ध खडसे वाद चर्चेचा विषय झालाय.या काळात गिरीश महाजनांचा दबदबा वाढला मुख्यमंत्री फडणवीसांचे संकेटमोचक अशी त्यांची प्रतिमा निर्माण झाली, यातून या दोन्ही नेत्यांतील दुरावा अधिक वाढल्याचं सांगण्यात येतंय.
गिरीश महाजन आणि एकनाथ खडसे यांच्यातला वाद का गेला विकोपाला? काय आहे पार्श्वभूमी?

जळगाव- हनी ट्रॅप प्रकरणावरुन मंत्री गिरीश महाजन आणि एकनाथ खडसे यांच्यातील वाद आता टोकाला गेल्याचं मानण्यात येतंय. कधीकाळी जळगाव जिल्ह्यात भाजपाचे चेहरे असलेले हे दोन नेते आता एकमेकांसमोर आव्हान म्हणून उभे राहिलेले दिसतायेत.

राज्यातील हनी ट्रॅप प्रकरणावरुन जळगाव जिल्ह्यातील भाजपाचे आजी माजी नेते एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. हनी ट्रॅप प्रकरणावरुन प्रफुल्ल लोढाच्या अटकेनंतर हे युद्ध चांगलंच तीव्र झालं. महिलांशी संबंध असल्याच्या प्रकरणावरुन आजी-माजी भाजपा नेत्यांत एकमेकांवर टीकासत्र सुरु झालं.

या सगळ्या वादानंतर दुसऱ्याच दिवशी एकनाथ खडसे यांच्या जावयाला रेव्ह पार्टी प्रकरणात अटक करण्यात आलीय. गिरीश महाजन आणि एकनाथ खडसे यांच्यातला वाद या निमित्तानं टोकाला पोहचल्याचं मानण्यात येतंय. २०१४ साली फडणवीस सरकारमध्ये मंत्री असलेल्या एकनाथ खडसेंना राजीनामा द्यावा लागल्यापासून गेल्या दशकभरात महाजन विरुद्ध खडसे वाद चर्चेचा विषय झालाय.या काळात गिरीश महाजनांचा दबदबा वाढला मुख्यमंत्री फडणवीसांचे संकेटमोचक अशी त्यांची प्रतिमा निर्माण झाली, यातून या दोन्ही नेत्यांतील दुरावा अधिक वाढल्याचं सांगण्यात येतंय.

महाजन विरुद्ध खडसे वादाची पार्श्वभूमी

१. 1990 च्या दशकात उत्तर महाराष्ट्रात एकनाथ खडसेंचा दबदबा होता
2. दोन दशकात एकनाथ खडसेंची जागा भाजपाच्या गिरीश महाजन यांनी घेतली.
३. एकनाथ खडसे भाजपाकडून 1990 साली एदलाबाद मतदारसंघातून पहिल्यांदा निवडून आले.
४. गिरीश महाजन 1995 मध्ये जामनेर मतदारसंघातून पहिल्यांदा निवडून आले.
५. 2014 पर्यंत खडसे यांनी सलग सहा विधानसभा निवडणुकांमध्ये विजय मिळवला
६. गिरीश महाजन यांनी आतापर्यंत सलग सात निवडणुकांमध्ये विजय मिळवलाय.
७. राज्यात आघाडीचं सरकार असताना खडसे – महाजनांनी जळगाव जिल्ह्यात भाजपा घोडदौड सुरू ठेवली
८. जळगाव जिल्हा परिषद कायम भाजपच्या ताब्यात ठेवण्यात यश मिळवले

महाजन विरुद्ध खडसे वाद

2014 च्या विधानसभा निवडणुकीत राज्यात सत्तातंर झालं आणि तेव्हापासून या दोन्ही नेत्यांतील अंतर वाढलं

1.2014 साली राज्यात भाजपा-शिवसेनेचं सरकार आल्यानंतर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले
२. त्यावेळी मुख्यमंत्री पदासाठी एकनाथ खडसे इच्छुक होते, ज्येष्ठ असल्याने पदावर होता दावा
३. दोन वर्षानंतर भोसरी भूखंड प्रकरणामुळे खडसेंना राजीनामा द्यावा लागला
४. राजीनाम्यानंतर खडसेंना पर्याय म्हणून गिरीश महाजनांचा चेहरा पुढे
५. गिरीश महाजनांकडे जलसंपदा आणि वैद्यकीय शिक्षण यासारखी मोठी खाती देण्यात आली.
६. याच काळात गिरीश महाजन यांनी जळगाव जिल्ह्यातील भाजपावर वर्चस्व मिळवलं
७. याच काळात खडसे आणि गिरीश महाजन यांच्यातलं अंतर वाढलं
८. 2019 विधानसभेवेळी खडसेंना उमेदवारी नाकारुन त्यांच्या मुलीला रोहिणी खडसेंना उमेदवारी देण्यात आली.
९. रोहिणी खडसेंच्या पराभावनंतर 2020 साली एकनाथ खडसेंचा भाजपा सोडून राष्ट्रवादीत प्रवेश

पुढे काय होणार?

या पक्षप्रेशावेळी एकनाथ खडसेंनी भाजपा आणि महाजनांना दिलेलं आव्हान गाजलं होतं. ही सीडी गिरीश महाजन यांच्या संदर्भात असल्याची चर्चा त्यावेळी रंगली होती. त्यानंतर आता प्रफुल लोढा प्रकरणामुळे या सीडीचा मुद्दा पुन्हा एकदा तापलाय.
खडसेंच्या पहिल्या जावयाच्या पतसंस्था घोटाळ्याचं प्रकरण, त्यानंतर रोहिणी खडसेंचा घटस्फोट, मुलगा निखिल खडसे यांची 2013 साली आत्महत्या यानंतर आता रोहिणी खडसे यांचे दुसरे पतीही आता अडचणीत सापडले आहेच.

याच खडसेंची सून रक्षा खडसे मात्र दोन टर्म रावेर मतदारसंघातून भाजपाकडून खासदारपदावर आहेत.
एकनाथ खडसेंना विधान परिषदेची संधी मविआच्या काळात मिळाली आणि त्याच काळात मविा सरकार कोसळलं. गेल्या दोन ते तीन वर्षांत एकनाथ खडसे भाजपात प्रवेश करण्याच्याही चर्चा दिल्लीपर्यंत रंगल्या. मात्र प्रत्यक्षात ते घडू शकलेलं नाही.
आता या हनी ट्रॅपच्या मुद्द्यावर खडसे आणि गिरीश महाजन यांच्यातला वाद टोकाला गेलाय. आता याचा पुढचा प्रवास कोणत्या दिशेनं होतो, हे पाहावं लागणार आहे.