PAYTM ने पेमेंट करून सोन्याचे नाणे जिंकता येणार, नेमकी ऑफर आहे तरी काय?

Rohit Shinde

सणासुदीच्या काळात विविध कंपन्या आणि प्लॅटफॉर्म त्यांच्या ग्राहकांसाठी विविध ऑफर उपलब्ध करुन देतात. अशाच प्रकारे फिनटेक कंपनी पेटीएमने एक भन्नाट ऑफर लॉन्च केली आहे. ज्याअंतर्गत पेटीएम त्यांच्या युजर्सला प्रत्येक पेमेंटसाठी सोन्याचे नाणे बक्षीस देईल. कंपनीने एक्सचेंज फाइलिंगमध्ये याची घोषणा केली. नेमकी ही ऑफर काय आहे, त्याबाबत अधिक सविस्तर जाणून घेऊ…

पेटीएमकडून गोल्ड कॉईन जिंकण्याची ऑफर

पेटीएमने आपल्या युजर्ससाठी एक नवीन ऑफर लाँच केली आहे. ज्यामध्ये प्रत्येक पेमेंटसाठी रिवॉर्ड म्हणून सोन्याची नाणी दिली जातात. ही सोन्याची नाणी नंतर डिजिटल सोन्यात रूपांतरित केली जाऊ शकतात. प्रत्येक व्यवहारासाठी, वापरकर्त्यांना व्यवहार मूल्याच्या 1 टक्के किमतीचे सोन्याचे नाणे मिळेल. 100 सोन्याची नाणी 1 रुपयांच्या समतुल्य आहेत, जी डिजिटल सोन्यात रूपांतरित केली जाऊ शकतात.

ही ऑफर पेटीएमद्वारे केलेल्या सर्व प्रकारच्या व्यवहारांसाठी वैध आहे. प्रत्येक व्यवहारासाठी सोन्याची नाणी मिळतील. यामध्ये क्यूआर कोडद्वारे व्यापारी पेमेंट, ऑनलाईन पेमेंट, मनी ट्रान्सफर, रिचार्ज, बिल पेमेंट आणि ऑटोमेटेड पेमेंट यांचा समावेश आहे. या ऑफरमध्ये यूपीआय पेमेंट, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड आणि नेट बँकिंग देखील समाविष्ट आहेत. तसेच जर युजर्स क्रेडिट कार्ड किंवा रुपे क्रेडिट कार्ड वापरून यूपीआय पेमेंट करतील तर त्यांना दुप्पट फायदा मिळेल, म्हणजेच त्यांना दुप्पट सोन्याची नाणी मिळतील.

युजर्सला प्रत्येक व्यवहारासाठी सोन्याच्या नाण्यांमध्ये व्यवहाराच्या रकमेच्या 1% रक्कम मिळेल. उदाहरणार्थ, 10,000 खर्च केल्यास 100 सोन्याची नाणी मिळतील. 1.5 लाख खर्च केल्यास 1,500 सोन्याची नाणी मिळतील, ज्या प्रत्येकाची किंमत अंदाजे 15 रुपये आहे. हे 0.01% कॅशबॅक प्रमाणे आहे मात्र, रोख रकमेऐवजी डिजिटल सोन्याच्या स्वरूपात आहे.

ताज्या बातम्या