लंडन- इंग्लंडमध्ये होत असलेल्या अवैध घुसखोरीविरोधात शनिवारी लंडनमध्ये जोरदार आंदोलन करण्यात आलं. या आंदोलनात सुमारे 1 लाख नागरिक सहभागी झाले होते.
या आंदोलनाला युनायटेड द किंगडम असं नाव देण्यात आलं होतं. घुसखोरीला विरोध करणारे नेते टॉमी रॉबिन्सन यांनी या मोर्चाचं नेतृत्व केलं. देशात गेल्या काही काळातील उजव्या विचारसरणीचा हा सर्वात मोठा मोर्चा मानण्यात येतोय.

आंदोलनकर्ते आणि पोलिसांत झटापट
शनिवारीच स्ँट अप टू रेसीझम नावाचं एक आंदोलनही शहरात झालं. यात सुमारे ५ हजार आंदोलक सहभागी झाले होते. दोन्ही गटातील तणाव रोखण्यासाठी पोलिसांनी घेरावबंदी केली होती.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, युनाइट द किंगडम मोर्चातील काही जणांनी पोलिसांचा घेराव तोडण्याचा प्रयत्न केला. विरोधी मोर्चाच्या दिशेनं जाण्याचा त्यांचा प्रयत्न होता. यावेळी काही पोलिसांवरही हल्ला करण्यात आल्याची माहिती आहे. स्थिती नियंत्रणात आणण्यासाठी 1600 पोलीस बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आले होते.
आंदोलकांवर अमेरिकेचा प्रभाव असल्याचं स्पष्ट जाणवत होतं. यूनियन जॅक आणि सेंट जॉर्ज क्रॉसचे झेंडे आंदोलकांच्या हाती होते. डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी संबंधित मेक अमेरिका ग्रेट अगेनच्या टोप्याही आंदोलकांनी घातल्या होत्या.
एलन मस्क यांचाही सहभाग
या मोर्चात टेस्लाचे मालक एलॉन मस्क हे व्हीसीद्वारे सहभागी झाले होते. यावेळी त्यांनी मोर्चाचं नेतृत्व करणाऱ्या टॉमी रॉबिन्सन यांच्याशी चर्चा केली. मस्क म्हणाले की, हिंसा तुमच्याकडे येते आहे. याच्याविरोधात लढा किंवा मरा, यावेळी मस्क यांनी इंग्लंडची संसद भंग करण्याची मागणी केली. सरकार बदलण्याची गरज असल्याचं मतही त्यांनी व्यक्त केलंय.
इंग्रंडचे पंतप्रधान पाहत होते मॅच
ज्यावेळी लंडनमध्ये हा मोठा मोर्चा काढण्यात आला होता, त्यावेळी इंग्लंडचे पंतप्रधान कीर स्टार्मर हे एक फिुलबॉल मॅच पाहण्यात मग्न होते. लंडनच्या एरिमेट्स स्टेडियममध्ये ते आपल्या मुलासह मॅच पाहत होते. यावरुन परिस्थिती किती गंभीरपणे हाताळण्यात येते आहे याची कल्पना आपल्याला येऊ शकेल. भविष्यात फ्रान्स आणि नेपाळसारखी स्थिती इंग्लंडमध्ये उद्भवू नये अशी चर्चा आता सुरुये.











