चीनच्या वाळवंटात युद्धाची तयारी? सॅटेलाईट इमेजमध्ये दिसली युद्धनौका? भारताला धोका?

Smita Gangurde

बिजिंग- दूर दूरपर्यंत मनुष्यही दिसत नाही, जिथं पाण्याच्या थेंबासाठी संघर्ष करावा लागतो, अशा चीनच्या टकलाकमान वाळवंटाची सध्या चर्चा सुरु आहे. निमित्त आहे सॅटेलाईन इमेजनं टिपलेल्या काही फोटोंचं. या वाळवंटात काही युद्ध नौका तैनात केल्या असल्याचं दिसतंय. इतकंच नाही तर या वाळवंटात रेल्वेलाईन, रनवे आणि नौसेनाच्या सैनिकांचा तळही दिसतो आहे.

कसं आहे टकलाकमान वाळवंट?

चीनच्या शिनजियांग प्रांतात चीनचं हे सर्वात मोठं वाळवंट आहे. याला टकलाकमान डेझर्ट या नावानं संबोधलं जातं. भारताच्या राजस्थानच्या आकाराचं हे वाळवंट आहे. याचा परीघ सुमारे 3.37 लाख वर्ग किमी इतका मोठा आहे. उन्हाळ्याच्या काळात या वाळवंटातील तापमान साधारणपणे 45 अंश सेल्सिअस इतकं जास्त असतं. तर रात्रीच्या काळात थंडी पडते आणि तापमान उणे 20 अंश सेल्सिअस इतकं असतं. वर्षभरात या परिसरात 100 मिमीपेक्षाही कमी पाऊस पडतो.

टकलाकमान वाळवंटात कोणतीही मनुष्य वसाहत नाही. दूरदूरपर्यंत केवळ रेतीचे डोंगर या ठिकाणी पाहायला मिळतात. मात्र भारतीय उपग्रहांनी घेतलेल्या काही फोटोमध्ये या वाळवंटात काही आकृत्या दिसल्या आहेत. अधिक अभ्यासानंतर या यातील काही आत्या या जहाजासारख्या दिसतायेत. या आकृत्यांच्यावर काही रनवेही दिसतायेत. या रनवेवरुन एयरक्राफ्ट कॅरियर जेट टेक ऑफ घेऊ शकतील अशी ही रचना आहे.

या परिसरातील इतर फोटोंमध्ये काही रनवेही दिसतायेत. ज्यांची लांबी साधारण दोन किमी इतकी आहे. या रनवेच्या उजव्या बाजूला 20 पेक्षा जास्त एयरक्राफ्ट तैनात असल्याचं या फोटोंमध्ये दिसतंय.

कुणी काढलेत हे फोटो?

हे फोटो अमेरिकेच्या नेव्हल इन्स्टिट्यूटनं प्रसिद्ध केले आहेत. समुद्रापासून हजारो किमी अंतरावर वाळवंटात युद्धनौका, युद्ध विमानं, रनवे, जेट्स का ठेवण्यात आलेत, याची चर्चा सध्या सुरु आहे.

अमेरिकेच्या सक्षम युद्धनौका वाळवंटात

चीनच्या वाळवंटात सॅटेलाईट इमेजमध्यै दिसणाऱ्या युद्धनौका या साध्यासुध्या नाहीत. अमेरिकेतील सर्वात ताकदवान मानल्या जाणाऱ्या युद्धनौकांपेक्षा वरचढ अशा या युद्धनौका आहेत. यातील पहिला फोटो हा अमेरिकेच्या यूएसएस गेराल्ड आर फोर्ड क्लास एयरक्राफ्ट कॅरियरसारखा आहे. ही युद्धनौका सध्या जगातील सर्वात मोठ्या युद्धनौकांपैकी एक आहे. दोन्ही युद्धनौकांची लांबी समान 337 मीटर इतकी आहे. ही युद्धनौका न्यूक्लियर क्षमतांनी भरलेली आहे.

या युद्धनौकेवरील कॅरियिरचा आकार आणि रडार व्यवस्था एकदम अमेरिकेच्या युद्धनौकेसारखी आहे. फोर्डच्या आधी ही देशातील सर्वात मोठी युद्धनौका मानण्यात येत होती. तिसरा काढण्यात आलेला फोटो हा एक ड्रिस्टॉयर आहे. अमेरिकेच्या आर्ले बर्क क्लास ड्रिस्टारसारखी याची रचना आहे. या नौकेच्या पुढच्या भागावर हल््ल्यासाठी फॉरवर्ड बंदुका, मध्यभागी मिसाईल लाँच सिस्टिम आणि मागच्या बाजूस एक हेलिपॅड आहे. चीनची ही युद्धनौका अगदी अमेरिकन युद्धनौकेची प्रतिकृती आहे.

चीन धक्का देण्याच्या प्रयत्नात?

चीन वाळवंटात निर्मिती करण्यात आलेल्या युद्धनौका, जेट्स आणि रनवे लपवण्याच्या प्रयत्नात असल्याचं दिसतंय. अमेरिकेच्या एका प्रायव्हेट अंतराळ तंत्रज्ञान कंपनीनं चीनची ही तयारी सॅटेलाईटद्वारे कॅमेऱ्यात बंद केली आहे. चीन अमेरिकेला धक्कातंत्र देण्यासाठी त्यांच्यासारखीच युद्धनौका निर्मिती करत असल्याची शक्यता वर्तवण्यात येतेय.याला डिसेप्शन युद्ध पद्धत म्हणतात. ज्यात शत्रूला आपल्या ताकदीची चुकीची माहिती देण्यात येते. जेव्हा शत्रू जाळ्यात अडकतो तेव्हा खरी ताकद दाखवून शत्रूचा खात्मा करण्यात येतो.

ताज्या बातम्या