दोन वेळा हल्ला करणाऱ्या कुत्र्यांना आता आजीवन कारावासाची शिक्षा, कोणी काढलं फर्मान?

रस्त्यावर फिरणाऱ्या कुत्र्यांचं आता काही खरं नाही. आता रस्त्यावरील कुत्र्यांनी कोणावर हल्ला केला आणि दोन वेळा चावा घेतला तर त्यांना आजीवन कारावासाची शिक्षा सुनावणी जाणार आहे.

उत्तर प्रदेशात रस्त्यावर फिरणाऱ्या कुत्र्यांचं आता काही खरं नाही. आता रस्त्यावरील कुत्र्यांनी कोणावर हल्ला केला आणि दोन वेळा चावा घेतला तर त्यांना आजीवन कारावासाची शिक्षा सुनावणी जाणार आहे. तसं पाहता ही शिक्षा मोठ्या गुन्ह्यासाठी माणसांना दिली जाते, मात्र आता उत्तर प्रदेशातील रस्त्यांवर फिरणाऱ्या भटक्या कुत्र्यांनाही ही शिक्षा दिली जाईल. योगी सरकारने हा आदेश जारी केला आहे.

अॅनिमल बर्थ कंट्रोल सेंटरमध्ये ठेवणार..

ही गोष्ट विचित्र वाटत असली तरी कुत्र्यांच्या हल्ल्यामुळे लोकांना होणारा त्रास लक्षात घेता प्रमुख सचिव नगर विकास अमृत अभिजात यांनी शहरातील सर्व पालिकांना आदेश जारी केले आहेत. यामध्ये हल्लेखोर कुत्र्यांना शिक्षा दिली जाणार आहे. आदेशानुसार, पहिल्यांदा कोणाला चावा घेतल्यानंतर कुत्र्याला पहिले दहा दिवसांची शिक्षा होईल आणि दुसऱ्यांचा चावा घेतल्याने आजीवन त्याला अॅनिमल बर्थ कंट्रोल सेंटरमध्ये ठेवलं जाईल.

प्रयागराज पालिकेचे पशुवैद्यकीय कल्याण अधिकारी डॉ. बिजय अमृतराज यांनी दिलेल्या माहितीनुसार, पालिकेकडून प्रसिद्ध केलेल्या आदेशानुसार, जर कोणत्या व्यक्तीला पहिल्यांदा कुत्रा चावला असेल तर त्याला दहा दिवसांची शिक्षा होईल. यादरम्यान कुत्र्याला अॅनिमल बर्थ कंट्रोल सेंटरमध्ये ठेवण्यात येईल. मात्र हा कुत्रा दुसऱ्यांचा चावला तर तीन सदस्यांची टीम या प्रकरणाचा तपास करेल. आणि कुत्र्याला एबीसी सेंटरमध्ये आजीवन ठेवण्यात येईल.

दत्तक घ्यावं लागेल..

आजीवन कारावासाची शिक्षा भोगणाऱ्या कुत्र्याची सुटका तेव्हाच होईल जेव्हा अधिकृत व्यक्ती त्याला दत्तक घेईल. दरम्यान हल्लेखोर आणि हिंसक झालेल्या कुत्र्याला शिक्षा देण्यासाठी जारी केलेल्या आदेशात काही अटी देण्यात आल्या आहेत. यासाठी पीडित व्यक्तीला सरकारी रुग्णालयात उपचाराचं प्रमाणपत्र द्यावं लागेल. एबीसी सेंटरवर उपचारासह कुत्र्यांवर लक्ष दिलं जाईल.


About Author

Smita Gangurde

Other Latest News