\फ्लिपकार्ट बिग बिलियन डेज सेल सुरू होण्यासाठी आता काही दिवसच शिल्लक आहेत. हा सेल २३ सप्टेंबरपासून सुरू होत आहे. त्यामुळे, जर तुम्ही तुमच्या घरासाठी किंवा स्वतःसाठी कोणतीही वस्तू खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर तुम्ही या सेलवरील मोठ्या सवलतींचा फायदा घेऊ शकता. मोबाईल फोनपासून फॅशन आणि सौंदर्य उत्पादनांपर्यंत, सेलमधील प्रत्येक वस्तूवर मोठी सूट दिली जाईल. तथापि, या मोठ्या सवलतींचा फायदा घेण्यासाठी, पैसे वाचवण्यासाठी तुम्ही सेल सुरू होण्यापूर्वी काही गोष्टी केल्या पाहिजेत.
मेंबरशिप देईल फायदा
फ्लिपकार्टची सेल 23 सप्टेंबरपासून सर्वांसाठी लाईव्ह होत आहे, पण जर तुम्ही याची मेंबरशिप घेतली असेल तर तुम्हाला सेल 24 तास आधीपासूनच एक्सेस करता येईल. स्टॉक संपण्यापूर्वी जर तुम्हाला कोणताही प्रॉडक्ट खरेदी करायचा असेल तर मेंबरशिप तुम्हाला यात मदत करेल. फ्लिपकार्ट प्लस आणि ब्लॅक अशा दोन प्रकारच्या मेंबरशिप्स देते. जर तुम्ही फ्लिपकार्टवर नियमित खरेदी करत असाल तर तुमच्याकडे सुपर कॉइन्स असतीलच. 200 सुपर कॉइन्सच्या बदल्यात तुम्ही प्लस मेंबर होऊ शकता. त्याशिवाय कंपनीच्या नवीन ब्लॅक मेंबरशिप प्रोग्राममुळेही तुम्ही मेंबर होऊ शकता. या प्रोग्राममध्ये अर्ली एक्सेस, खास सवलती आणि अनेक फायदे मिळतात.

क्रेडिट कार्डचे फायदे
फ्लिपकार्ट सेल दरम्यान अॅक्सिस आणि आयसीआयसीआय बँक क्रेडिट कार्डधारकांना एक खास भेट मिळेल. ही कार्डे सर्वाधिक सूट देतात. जर तुमच्याकडे ही कार्डे नसतील तर तुम्ही त्यांच्यासाठी अर्ज करू शकता. जर तुमच्याकडे आधीच असतील तर ती सुरक्षित ठेवा. विक्री सुरू होताच तुम्ही ती वापरू शकता.
प्रॉडक्ट्सची वॉच लिस्ट करा
सेलच्या दरम्यान मोठ्या प्रमाणात लोक खरेदी करतील. अशा परिस्थितीत अनेक प्रॉडक्ट्स आउट ऑफ स्टॉक होऊ शकतात. यामुळे बचाव करण्यासाठी तुम्ही आधीच तुमच्या आवडत्या प्रॉडक्ट्सची वॉच लिस्ट तयार करू शकता. याचा फायदा असा होईल की सेल सुरू झाल्यानंतर तुम्हाला प्रॉडक्ट्स साठी शोध घ्यावे लागणार नाही आणि तुम्ही अॅप किंवा वेबसाईट उघडताच लगेचच ऑर्डर देऊ शकता.











