नव्या लेबर कायद्यामुळे तुमची पगार कमी होईल का? तज्ज्ञांचं काय मत? जाणून घ्या

कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी आहे. देशातील 29 जुन्या कामगार कायद्यांना एकत्रित करून 4 नवे लेबर कोड लागू करण्यात आले आहेत. या बदलांनंतर केवळ ग्रॅच्युइटी, पीएफ आणि पेन्शनसारखे निवृत्ती निधी अधिक मजबूत होणार नाहीत, तर अनेक कर्मचाऱ्यांच्या मासिक टेक-होम सॅलरीवरही परिणाम होऊ शकतो.

तज्ञांचे म्हणणे आहे की सोशल सिक्युरिटी वाढवण्यासाठी हे बदल आवश्यक आहेत. पण यामुळे तुमची पगाररक्कम कमी होणार का? याचा संपूर्ण परिणाम समजून घेणे खूप महत्त्वाचे आहे.

काय बदल झाले?

29 जुन्या कामगार कायद्यांना एकत्र करून त्यात बदल करून 4 नवीन लेबर कोड तयार करण्यात आले आहेत. या बदलाचा उद्देश सर्व नियम सोपे करणे आणि कर्मचाऱ्यांसाठी सुरक्षा वाढवणे हा आहे.

नव्या कोडनुसार फिक्स्ड टर्म कर्मचारी, कॉन्ट्रॅक्ट वर्कर आणि गिग वर्कर आता सामाजिक सुरक्षा यंत्रणेत समाविष्ट झाले आहेत. यात ग्रॅच्युइटी, पीएफ, पेन्शन यासारख्या सुविधांचा लाभ घेण्याचा हक्कही वाढवण्यात आला आहे.

कंपन्यांसाठी नियम आता सोपे झाले आहेत आणि जास्तीत जास्त कर्मचारी या सुविधांचा लाभ घेऊ शकतील. पण कर्मचाऱ्यांच्या मध्ये मोठा प्रश्न असा आहे की नवीन कायद्यांमुळे त्यांची टेक-होम सॅलरी प्रभावित होणार आहे की नाही.


About Author

Jitendra bhatavdekar

Other Latest News