UPSC ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्याने ब्लेडने कापला स्वत:चा प्रायव्हेट पार्ट, हैराण करणारं कारण

सर्जिकल ब्लेडने स्वत:चा प्रायव्हेट पार्ट कापला. प्रायव्हेट पार्ट कापण्यापूर्वी स्वत:ला सुन्न करण्यासाठी त्याने एनेस्थेशियाचं इंजेक्शन दिलं होतं.

उत्तर प्रदेशातील प्रयागराज जिल्ह्यातून एक हैराण करणारा प्रकार समोर आला आहे. येथे यूपीएससीची तयारी करणाऱ्या एका विद्यार्थ्याने मुलगी होण्याच्या इच्छेसाठी स्वत:चा प्रायव्हेट पार्ट कापल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. विद्यार्थ्याने केलेलं कृत्य त्याला महागात पडलं आहे. जेंडर बदलण्याच्या नादात त्याने रक्तबंबाळ अवस्थेत त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. येथे त्याच्यावर उपचार सुरू आहेत. हा विद्यार्थी युपीएससीची तयारी करीत होता. मुलगी होण्याच्या इच्छेखातर त्याने सर्जिकल ब्लेडने स्वत:चा प्रायव्हेट पार्ट कापला. प्रायव्हेट पार्ट कापण्यापूर्वी स्वत:ला सुन्न करण्यासाठी त्याने एनेस्थेशियाचं इंजेक्शन दिलं होतं.

बनावटी डॉक्टरांच्या सल्ल्याने कापला प्रायव्हेट पार्ट

विद्यार्थ्याने सांगितलं की, एक बनावटी डॉक्टरच्या सल्ल्याने त्याने हे कृत्य केल्याचं सांगितलं. जेव्हा इंजेक्शनचा परिणाम कमी होऊ लागला तर त्याची तब्येत बिघडली आणि तडफडू लागला. घर मालकाने तडफडणाऱ्या तरुणाला सरकारी रुग्णालयात दाखल केलं, यानंतर त्याला दुसऱ्या रुग्णालयात हलविण्यात आलं. सध्या त्याच्यावर एसआरएन रुग्णालयात उपचार सुरू आहे.

मुलगी होण्याची इच्छा…

तरुणाने याबाबत सांगितलं की, त्याला मुलही व्हायचंय. मात्र कोणीच त्याचं ऐकत नाही. त्यामुळे त्याने अशा प्रकारचं पाऊल उचललं. १४ वर्षांचा असताना त्याला मुलगी असल्याची भावना निर्माण झाली. हा तरुण केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची तयारी करीत आहे.

एकुलता एक मुलगा

तरुणाने सांगितलं की, तो आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा आहे. मात्र तो कुटुंबीयांना याबाबत काहीच सांगू शकत नाही. काही दिवसांपूर्वी तो मावशीकडे राहत होतो. यानंतर प्रयागराज येथे आला आणि एक खोली घेऊन परीक्षेची तयारी करू लागला. मुलगी होण्यासाठी तो युट्यूबची मदत घेत होतो. त्याने कटरामध्ये एका बनावटी डॉक्टरांची मदत घेतली. त्याच्या सांगण्यांनुसार, विद्यार्थ्याने हा प्रताप केला.


About Author

Smita Gangurde

Other Latest News