बिहारच्या राजकारणात लालू प्रसाद यादवांनी एक काळ गाजवला. बिहारच्या राजकीय पटलावर लालू प्रसाद यादवांचा एकछत्री अंमल पाहायला मिळाला. मात्र, गेल्या काही लालू प्रसाद यादवांचे राजकीय आणि कौटुंबिक जीवन पूर्णपणे उध्वस्त झाले. त्यांचे पुत्र तेजप्रताप यादवांनी वेगळी राजकीय चूल मांडून पाहिली. मात्र, तेजप्रताप यादवांना कोणतेही ठोस आणि प्रभावी यश मिळविता आले नाही. लालू प्रसाद यादव यांचे थोरले चिरंजीव तेजप्रताप यादवांची आमदरकी गेली आहे. तेज प्रताप यांना पराभव स्वीकारावा लागला. त्यानंतर तेजप्रताप यादव यांनी आता वेगळी वाट निवडली आहे. त्यांनी स्वतःची नवी ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू केला तेज प्रताप यादव यूट्यूबर बनले आहे. TY Vlog लॉन्च होताच व्हायरल झाला आहे.
TY VLOG लाँच आणि काही तासांत व्हायरल
बिहारच्या राजकारणात सतत चर्चेत राहणारे राष्ट्रीय जनता दल (RJD) प्रमुख लालू प्रसाद यादव यांचे थोरले चिरंजीव तेजप्रताप यादवांची आमदरकी गेली आहे. तेज प्रताप यांना पराभव स्वीकारावा लागला. आता तेज प्रताप यादव यांनी नवा प्रवास सुरू केला आहे. पक्ष आणि कुटुंबापासून राजकीय पातळीवर वेगळे झाल्यानंतर त्यांनी स्वतःची नवी ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू केला तेज प्रताप यादव यूट्यूबर बनले आहे. TY Vlog लॉन्च होताच व्हायरल झाला आहे.

बिहार विधानसभा निवडणूक 2025 नुकतीच पार पडली. विधानसभा निवडणुकीत तेजप्रताप यांनी स्वतःचा नवा पक्ष जनशक्ति जनता दल (JJD) स्थापन केला होता. महुआ मतदारसंघातून ते स्वतः मैदानात उतरले होते. पण, भाजपच्या लाटेत JJD सह RJD चा सूपडा साफ झाल्याचे पाहायला मिळाले. निकाल त्यांच्या विरोधात लागला. त्यांच्या पक्षातील एकही उमेदवार अपेक्षित कामगिरी करू शकला नाही. राजकीय निराशेनंतर आता तेज प्रताप यादव यांनी डिजिटल जगतात उडी घेतली आहे. 17 नोव्हेंबर रोजी तेजप्रताप यांनी स्वतःचा नवीन ब्लॉगिंग चॅनेल ‘TY VLOG’ सुरू केलं आहे. तेज प्रताप यांचा पहिलाच व्हिडिओ अपलोड होताच, तो तुफान व्हायरल झाला आहे. त्यामुळे तेज प्रताप पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.
पहिल्या व्हिडिओमध्ये नेमकं काय विशेष?
पहिल्या व्हिडिओत तेज प्रताप यांनी एका डेअरी मिल्क प्रॉडक्शन फॅक्टरीचा दौरा केला. दूध प्रक्रिया, मिल्क कलेक्शन ते क्वालिटी टेस्टिंग आणि पॅकेजिंग, हे तेज प्रताप यांनी अत्यंत सोप्या भाषेत समजावून सांगितले. व्हिडिओमध्ये संपूर्ण प्रक्रिया तपशीलवार दाखवण्यात आली आहे. तेज प्रताप यादवांचा पहिला व्हिडिओ YouTube वर अपलोड होताच तो जबरदस्त हिट ठरला. त्याला 50 हजारांहून अधिक व्ह्यूज आणि 3500 लाईक्स मिळाले आहेत. सोशल मीडियावर तेज प्रताप यांचा नवा अंदाज पाहून थक्क झाले आहेत. नेटिजन्सकडून तेज प्रताप यांचं कौतुक देखील होत आहे. तेजप्रताप यांच्या सुरक्षेसाठी योग्य ती काळजी घेतली जात आहे.











