Bihar Election: बिहारमध्ये मोठी घडामोड; राष्ट्रीय जनता दलाने 36 विद्यमान आमदारांचं तिकीट कापलं!

बिहारमध्ये खरंतर मोठी राजकीय घडामोडी घडताना दिसत आहे. कारण, राष्ट्रीय जनता दलाने तिकीट वापट करताना जवळपास 36 विद्यमान आमदारांचे तिकीट कापल्याची माहिती समोर येत आहे.

बिहार विधानसभा निवडणुकीच्या रणातून सातत्याने नवनव्या अपडेट्स समोर येताना दिसत आहेत. तेजस्वी यादव यांच्या नेतृत्वात राजदने बिहार विधानसभा निवडणुकासाठी 143 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. यामध्ये राजदने 36 विद्यमान आमदारांचे तिकीट कापल्याची माहिती समोर येत आहे. बिहारमधील निवडणुकांकडे देशाचे लक्ष लागले असून सर्वच प्रमुख राजकीय पक्षाकडून उमेदवारांची घोषणा होत आहे. त्यामध्ये, काही विद्यमान आमदारांचेही तिकीट कापलं जात असून नवे चेहरे मैदानात उतरवले जात आहेत.

आरजेडीकडून नवे चेहरे मैदानात

राष्ट्रीय जनता दलाने यंदा तिकीट वाटपात अनेक फेरबदल केले आहेत. गत 2020 च्या निवडणुकीत जिंकलेल्या 36 जागांवरील उमेदवार बदलून नवी रणनीती आखली आहे. त्यामध्ये, माजी मंत्री तेजप्रताप यादव यांच्या मतदारसंघात देखील दुसराच उमेदवार देण्यात आला आहे. तर, 36 विद्यमान आमदारांचेही तिकीटही कापले आहे. तेजस्वी यादव यांच्या नेतृत्वात राजदने बिहार विधानसभा निवडणुकासाठी 143 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. गतनिवडणुकीत 144 जागांवर निवडणूक लढवणाऱ्या राजदने यंदा बहुतांश विद्यमान आमदारांचे तिकीट कापलं आहे. तब्बल 36 विद्यमान आमदारांचे तिकीट पक्षाने कापले, त्यामुळे पक्षात खळबळ उडाली असून मोठ्या प्रमाणात बंडखोरी होण्याची शक्यता दिसून येते.

बिहार विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम

मतचोरीचे गंभीर आरोप, राज्य सरकारनं जाहीर केलेल्या अनेक योजना, महिलांच्या बँक खात्यांमध्ये थेट जमा करण्यात आलेले पैसे या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर बिहारमध्ये विधानसभा निवडणूक होत आहे. निवडणूक आयोगानं पत्रकार परिषद घेत निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या आहेत. बिहारमध्ये दोन टप्प्यांमध्ये मतदान होईल. ६ आणि ११ नोव्हेंबरला मतदान घेतलं जाईल. १४ नोव्हेंबरला मतमोजणी होऊन निकाल जाहीर केला जाईल. सत्ताधारी भाजप आणि विरोधी पक्षातील राष्ट्रीय जनता दल यांनी दोन टप्प्यांमध्ये निवडणूक घेण्याची मागणी केली होती. विशेष म्हणजे भाजप हा सत्तेतला, तर राजद हा विरोधी बाकांवरील सर्वात मोठा पक्ष आहे. भाजप आणि राजदचे ७० पेक्षा अधिक आमदार विधानसभेत आहेत. दोन्ही बड्या पक्षांनी केलेली मागणी निवडणूक आयोगानं मान्य केली आहे.

राज्यात एकूण ७.४३ कोटी मतदार आहेत. यामधील ३.९२ पुरुष आणि ३.५० कोटी महिला मतदार आहेत. ७.२ लाख दिव्यांग मतदार आहेत. राज्यातील तरुण मतदारांचा (२० ते २९ वर्षे) १.६३ कोटींच्या घरात आहे. तर पहिल्यांदाच मतदान करणाऱ्यांची संख्या १४.०१ लाख इतकी आहे.

काँग्रेसच्या यादीची प्रतीक्षा कायम

बिहार विदानसभा निवडणुकीसाठी दुसऱ्या टप्प्यातील अर्ज भरण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. मात्र, इंडिया अघाडीतील पेच सुटलेला नाही. महागठबंधनमधील राजकीय पक्ष काही जागांवर आमने सामने आले आहेत. महागठबंधनमधील काँग्रेस, राजद, व्हीआयप, सीपीआय आमने सामने आले आहेत. हा पेच एकूण 11 जागांवर असल्याची माहिती होती. मात्र, राजदने आज 143 उमेदवारांची यादी जाहीर केल्याने हा पेच सुटल्याचं दिसून येत आहे. आता, काँग्रेसकडून आपल्या उमेदवारांची यादी कधी जाहीर होईल, हेच पाहावे लागेल.


About Author

Rohit Shinde

Other Latest News