आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंचे शिवसेना ॲक्शन मोडमध्ये आली आहे. या निवडणुकीसाठी उद्धव ठाकरेंकडून आज 40 स्टार प्रचारकांची यादी जाहीर करण्यात आली आहे . यामध्ये भास्कर जाधव, सुषमा अंधारे, ओमराजे निंबाळकर, किरण माने यांच्यासारख्या मातब्बर नेत्यांचा समावेश आहे. महत्त्वाची बाब म्हणजे सध्या कॅन्सर सारख्या आजाराने त्रस्त असलेल्या शिवसेना खासदार संजय राऊत यांचेही नाव या यादीमध्ये पाहायला मिळते.
स्टार प्रचारकांच्या यादीत कोण कोण??
1. उद्धवजी बाळासाहेब ठाकरे
2. आदित्य ठाकरे
3. सुभाष देसाई
4. संजय राऊत
5. अनंत गीते
6. चंद्रकांत खैरे
7. अरविंद सावंत
8. भास्कर जाधव
9. अनिल देसाई
10. विनायक राऊत
11. अनिल परब
12. राजन विचारे
13. सुनील प्रभू
14. आदेश बांदेकर ?
15. वरुण सरदेसाई
16. अंबादास दानवे
17. रवींद्र मिर्लेकर
18. विशाखा राऊत
19. नितीन बनूगडे पाटील
20. राजकुमार बाफना
21. प्रियांका चतुर्वेदी
22. सचिन अहिर
23. मनोज जामसुतकर
24. सुषमा अंधारे
25. संजय (बंडू) जाधव
26. किशोरी पेडणेकर
27. ज्योती ठाकरे
28. शीतल शेठ–देवरूखकर
29. जान्हवी सावंत
30. शरद कोळी
31. ओमराजे निंबाळकर
32. सुनील शिंदे
33. वैभव नाईक
34. नितीन देशमुख
35. आनंद दुबे
36. किरण माने
37. अशोक तिवारी
38. प्रियांका जोशी
39. सचिन साठे
40. लक्ष्मण वाडले

उद्धव ठाकरे भाजप विरोधात आक्रमक
दरम्यान उद्धव ठाकरे ही भाजप विरोधात नेहमीच आक्रमक राहिलेत. सध्या ती मराठवाडा दौऱ्यावर असून शेतकरी कर्जमाफी, पिकाला हमीभाव, महापुरात सरकारने केलेली तोकडी मदत, फसवे आश्वासन आधी मुद्द्यावरून सरकारवर टीकेची झोड उठवत आहेत. यंदा अति पाऊस झाला, शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं, लोकांचं आयुष्य पाण्यात वाहून गेलं. सरकार आल्यानंतर सातबारा कोरा करणार असं म्हटले होते पण तसं झालं नाही, आता सातबारा कोरा करण्याची योग्य वेळ आहे असे ठाकरेंनी म्हटलं तसेच जोपर्यंत शेतकऱ्याला न्याय मिळत नाही तोपर्यंत शिवसेना ही कायमच शेतकऱ्यांच्या सोबत असेल असे म्हणत उद्धव ठाकरेंनी शेतकऱ्यांना धीर दिला.











