Maharashtra Politics: महायुतीच्या गोटातून मोठी बातमी! स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी नियोजन ठरलं!

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसंदर्भात महायुतीच्या गोटातून मोठी बातमी समोर आली आहे. कोण कुठे कसं लढणार? याच नियोजन महायुतीने आखलं आहे.

महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळात सध्या फक्त आणि फक्त स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या हालचाली सध्या सुरू आहेत. गेली अनेक दिवसांपासून सुरू असलेला खल अखेर संपून मुंबई महनगर पालिकेची निवडणूक महायुती एकत्रित लढणार असल्याची बातमी समोर आली आहे. मात्र राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या रणात महायुतीतील पक्ष स्वबळावर मैदानात उतरतील अशी शक्यता आता निर्माण झाली आहे.

महायुतीचं कसं आहे नियोजन?

गेली अनेक दिवसांपासून सुरू असलेला खल अखेर संपून मुंबई महनगर पालिकेची निवडणूक महायुती एकत्रित लढणार असल्याची बातमी समोर आली आहे. त्याचबरोबर राज्यातही काही ठिकाणी स्वतंत्र लढण्याचा महायुतीचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, स्वतंत्र लढले तरी निवडणुकीनंतर त्या त्या ठिकाणी पुन्हा एकत्र येणार असं ठरल्याचीही सुत्रांची माहिती आहे.

महापालिकांबाबत मोठा निर्णय

महापालिका निवडणुकीसाठी महायुतीचा फॉर्म्यूला ठरला आहे. मुंबईमध्ये भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी हे तीनही पक्ष एकत्र लढणार असल्याची माहिती समोर येत आहे. तर दुसरीकडे पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये भाजप स्वबळावर लढणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. तर ठाणे महापालिका निवडणुकीबाबत अद्याप कोणताही निर्णय झालेला नाहीये, ठाण्यात महायुती म्हणून एकत्र लढता येईल का? याची चाचपणी होणार असल्याची माहिती देखील फडणवीस यांनी दिली आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले…

मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांचे शिवसेना आणि मनसे पक्ष एकत्र आले आहेत. या दोघांचे आव्हान महायुती कशाप्रकारे परतवून लावणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या होत्या. त्यामुळेच महायुतीने मुंबईत एकत्र लढण्याचा निर्णय घेतल्याचे दिसत आहे. तर उर्वरित ठिकाणी रणनीती आखून एकत्र लढायचे की वेगवेगळे लढायेच हे आम्ही ठरवू, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.


About Author

Rohit Shinde

Other Latest News