Raj Thackeray : प्रश्नांची सरबत्ती, निवडणुक आयुक्त गोंधळले; राज ठाकरेंनी Video शेअर करत घेतला समाचार

दुबार मतदार नोंदणीपासून, ते मतदार यादीतील अनेक घोळ या सगळ्यावर एकही प्रश्न विचारल्यावर जर निवडणूक आयोगाला एकही उत्तर देता येत नसेल किंवा द्यायची इच्छा नसेल तर तुमचा उपयोग काय ?

महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाने आज पत्रकार परिषद घेत राज्यातील नगरपंचायत आणि नगरपालिका निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. या पत्रकार परिषदेत उपस्थित पत्रकारांनी दुबार मतदान नोंदणी आणि मतदार यादीतील घोळाच्या ज्या चर्चा सुरू आहेत त्याबाबत निवडणूक आयुक्तांवर प्रश्नांची सरबत्ती केली. मात्र आयुक्त पत्रकारांच्या प्रश्नावर समाधानकारक उत्तर शकले नाहीत. यावरून मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी संताप व्यक्त केला.. आता १००% खात्री पटली की निवडणूक आयोग हे सत्ताधाऱ्यांच्या हातातील बाहुले आहे अस राज ठाकरे यांनी म्हटलं. राज ठाकरे यांनी याबाबत सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे.

काय आहे राज ठाकरे यांची पोस्ट ? Raj Thackeray

राज ठाकरे यांनी त्यांच्या फेसबुक अकाऊंटवर एक पोस्ट शेअर केली. त्यात त्यांनी म्हटले, आजच्या निवडणुका आयोगाच्या पत्रकार परिषदेची क्लिप मला कोणीतरी पाठवली. ती पाहून तळपायाची आग मस्तकात गेली ! आणि आता १००% खात्री पटली की निवडणूक आयोग स्वायत्त आहे हे फक्त संविधानात आहे.. हे सत्ताधाऱ्यांच्या हातचं बाहुलं आहे… दुबार मतदार नोंदणीपासून, ते मतदार यादीतील अनेक घोळ या सगळ्यावर एकही प्रश्न विचारल्यावर जर निवडणूक आयोगाला एकही उत्तर देता येत नसेल किंवा द्यायची इच्छा नसेल तर तुमचा उपयोग काय ? जबाबदारी तर तुम्ही केंव्हाच झटकली आहेत, आत्ता उत्तरदायित्व पण नाकारणार, मग तुमच्या पदांच करायचं काय ?

राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी आपल्या पोस्ट मध्ये पुढे म्हटलं, महाराष्ट्रातील जनतेने ही क्लिप जरूर पहा… तुमच्या मतदानाचा ढळढळीत अपमानाचा उगम कुठून आहे हे तुम्हाला कळेल… बाकी या पत्रकार परिषदेत प्रश्न विचारून निवडणूक आयोगाची भंबेरी उडवणाऱ्या पत्रकारांचं मनापासून अभिनंदन… अशी पोस्ट राज ठाकरे यांनी केली आहे.

आयुक्त गोंधळले होते –

दरम्यान आजच्या निवडणूक आयुक्तांच्या पत्रकार परिषदेत पत्रकारांनी एकामागून एक प्रश्न विचारल्याने आयुक्त गोंधळून गेले.  सुलभ शौचालय आणि आयुक्तांच्या घराच्या नावे असणाऱ्या यादीला जबाबदार कोण? असा प्रश्न विचारला असता आयुक्तांनी, ‘मतदारयादीची यंत्रणा वेगळी आहे’ असं उत्तर दिलं. “आम्ही फक्त ती यादी स्विकारतो. आम्ही एक तारीख ठरवतो आणि त्यादिवशी ती स्विकारतो असे ते म्हणाले.


About Author

Asavari Khedekar Burumbadkar

Other Latest News