मार्गशीर्ष महिन्याला हिंदू धर्मात विशेष आध्यात्मिक महत्त्व आहे, कारण तो ‘श्रीकृष्णाचा महिना’ मानला जातो. या महिन्यात श्रीकृष्णाची भक्ती केली जाते, देवी महालक्ष्मीची पूजा केली जाते आणि प्रत्येक गुरुवारी व्रत व पूजा यांचे महत्त्व आहे, ज्यामुळे सुख, समृद्धी आणि संपत्ती मिळते. या महिन्यात केलेल्या दान-पुण्याचेही मोठे फळ मिळते असे मानले जाते. मार्गशीर्ष गुरुवारच्या उपवासात काय खावे याबद्दल जाणून घेऊयात…
मार्गशीर्ष गुरुवारच्या उपवासात काय खावे?
श्रीमहालक्ष्मी गुरुवारच्या उपवासात तुम्ही फळे, दूध, दही, सुकामेवा, राजगिरा यांसारखे व्रत-अनुकूल पदार्थ खाऊ शकता. दिवसभर पाणी आणि फळांचा आहार घेणे हा कठोर उपवास आहे, तर काही जण दिवसभरातून एकदा सात्विक जेवण घेतात. शेंगदाणे, राजिगीरा, साबुदाणा, बटाटा, रताळे आणि शिंगाड्याचे पीठ यांपासून बनवलेले पदार्थ खावेत. सैंधव मीठ वापरून केलेले पदार्थ उपवासाला चालतात. नैवेद्य म्हणून गोड पदार्थ बनवून तो देवीला अर्पण करून नंतर उपवास सोडावा.

उपवासात काय टाळावे?
कांदा, लसूण खाणं टाळतात. गहू, तांदूळ, डाळी, हरबरा, मूग, मसूर राजमा यांसारखी धान्य आणि कडधान्य खाऊ नयेत. जर तुम्ही पूर्ण उपवास करत नसाल तर सात्विक फलाहार घ्या. नेहमीचे मीठ वापरू नका, फक्त सैंधव मीठ वापरा. हा उपवास सात्विक असावा, ज्यामुळे घरात सुख-समृद्धी नांदते. उपवासाच्या वेळी दारू, सिगारेट किंवा कोणत्याही प्रकारचे मादक पदार्थ सेवन करू नका.
(टीप : वरील सर्व बाबी MP मराठी Breaking केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून MP मराठी Breaking कोणताही दावा करत नाही.)











