गतवर्षी पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर महायुतीमध्ये अंतर्गत राजकारण काय घडलं?? देवेंद्र फडणवीस यांच्या (Uddhav Thackeray On Devendra Fadnavis) जागी मुख्यमंत्रीपद कोणाला देण्यात येणार होते?? याबाबत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. देवेंद्र फडणवीस हे अॅक्सीडेंटल मुख्यमंत्री आहेत, नाहीतर ते दाढी वाल्यालाच मुख्यमंत्री करणार होते असा खुलासा उद्धव ठाकरेंनी केला.
काय म्हणाले उद्धव ठाकरे ( Uddhav Thackeray On Devendra Fadnavis)
उद्धव ठाकरे हे सध्या मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहेत शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन ते त्यांच्या व्यथा जाणून घेत आहेत. आज जालना येथे जाहीर पत्रकार परिषद घेत उद्धव ठाकरेंनी सरकारवर टीकेची झोड उडवली. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संदर्भात मोठा गौप्यस्फोट (Uddhav Thackeray On Devendra Fadnavis) केला. देवेंद्र फडणवीस हे अॅक्सीडेंटल मुख्यमंत्री आहेत. नाहीतर ते दाढी वाल्यालाच मुख्यमंत्री करणार होते असं उद्धव ठाकरे म्हणाले. म्हणजेच काय तर राज्यात पुन्हा एकदा महायुतीचे सरकार आल्यानंतर भाजप हायकमांड देवेंद्र फडणवीस यांच्या ऐवजी एकनाथ शिंदेंकडेच पुन्हा मुख्यमंत्रीपद देण्याच्या विचारात होते.

सरकारवर हल्लाबोल –
यावेळी पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरेंनी भाजप आणि महायुती सरकारवर सरकून टीका केली. भाजप म्हणजे भ्रष्टाचारी जनता पार्टी असा उल्लेख ठाकरेंनी केला. तसेच शेतकऱ्यांच्या पिकाला हमिभाव मिळाला पाहिजे, आत्ताच ती वेळ आहे सातबारा कोरा करायची, संपूर्ण जमीन खरडून गेली आहे. शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. लोकांचं आयुष्य पाण्यात वाहून गेलं. सरकार आल्यानंतर सातबारा कोरा करणार असं म्हटले होते पण तसं झालं नाही, आता सातबारा कोरा करण्याची योग्य वेळ आहे असे म्हणत उद्धव ठाकरेंनी शेतकरी कर्जमाफीचा मुद्दा पुन्हा एकदा उचलून धरला.











