भारतीय क्रिकेट संघाचा हिटमॅन रोहित शर्माचे कर्णधार पद काढण्यात आल्यानंतर टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर (Gautam Gambhir On Virat And Rohit) चाहत्यांच्या निशाण्यावर आहे. गंभीरमुळेच रोहित शर्माचे कर्णधारपद गेले अशी चर्चा देशभरात सुरू असते. कर्णधार पद गेल्यामुळे रोहित शर्मा आणि त्याच्यासोबत विराट कोहलीचेही आगामी 2027 चा t20 वर्ल्ड कप खेळण्याचे स्वप्न अधुरेच राहते की काय अशी शंकाही क्रिकेट प्रेमीच्या मनात येऊ लागली आहे. याबाबत आता दस्तूर खुद्द गौतम गंभीरलाच विचारल असता गंभीरने जे उत्तर दिलं ते पाहून विराट आणि रोहितच्या चाहत्यांचा पारा आणखी चढेल.
काय म्हणाला गौतम गंभीर??Gautam Gambhir On Virat And Rohit
वेस्टइंडीज विरुद्धच्या कसोटी मालिका विजयानंतर गौतम गंभीरने प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्याला विराट कोहली आणि रोहित शर्मा बाबत विचारल असता, गंभीर म्हणाला, विराट कोहली आणि रोहित शर्मा हे दोघेही दर्जेदार खेळाडू आहेत आणि त्यांचा अनुभव अमूल्य असेल. परंतु २०२७ चा विश्वचषक अजून अडीच वर्षे दूर आहे, त्यामुळे वर्तमानावर लक्ष केंद्रित करणे महत्त्वाचे आहे. कोहली आणि रोहित दोघेही अपवादात्मक खेळाडू आहेत. विराट आणि रोहितच्या पुनरागमनामुळे संघाचा उत्साह वाढेल. मला आशा आहे की त्यांचा ऑस्ट्रेलिया दौरा यशस्वी होईल आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे, भारतीय संघ ऑस्ट्रेलियामध्ये चांगली कामगिरी करेल. Gautam Gambhir On Virat And Rohit

रोहित असताना गिलला कॅप्टन का केलं??
दरम्यान, रोहित शर्मा असताना शुभम गिल ला कॅप्टन का केलं?? असा सवाल केला असता गंभीरने यामागचं कारण सांगून टाकलं. गंभीर म्हणाला, मला वाटते की तो वनडे कर्णधार होण्यासाठी पात्र होता. गिलने खूप मेहनत घेतली आहे आणि सर्व निकष पूर्ण केले आहेत. प्रशिक्षक म्हणून, जर एखादा खेळाडू योग्य गोष्टी बोलत असेल. योग्य गोष्टी करत असेल. कठोर परिश्रम करत असेल. योग्य दृष्टिकोन बाळगत असेल आणि पुढे येत नेतृत्व करत असेल, तर प्रशिक्षक आणखी काय पाहीजे? असे गौतम गंभीरने म्हटले.











