India Pakistan Match : भारतीय खेळाडूंनी सामन्यानंतर हँडशेक का केलं नाही? ही कल्पना कुणाची होती?

क्रिकेट सामन्यामध्ये नाणेफेकीवेळी कर्णधारांनी एकमेकांशी हस्तांदोलन करणं हे खेळभावनेचं प्रतिक मानलं जातं.

मुंबई- युद्धभूमीपाठोपाठ खेळाच्या मैदानातही भारतानं पाकला चारही मुंड्या चित केलं. मात्र यावेळी टीम इंडियानं दाखवलेल्या करारी बाण्यामुळं देशवासियांचं मान अभिमानानं फुलून आला. टॉसनंतर कर्णधार सूर्यकुमार यादवसह भारतीय खेळाडूंनी पाकिस्तानच्या खेळाडूंशी हस्तांदोलन न करता तोंडघशी पाडलं. विशेष म्हणजे, जेव्हा पाकिस्तानी संघ भारतीय ड्रेसिंग रूममध्ये आला, तेव्हा त्यांच्या तोंडावर दरवाजे बंद करण्यात आलं.

मात्र पाकिस्तानी खेळाडूंशी हँडशेक टाळण्याची कल्पना कर्णधार सूर्यकुमार यादव याची नव्हती तर टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी मांडली होती.

हँडशेक टाळण्याची कल्पना गौतम गंभीर यांची!

भारतीय खेळाडूंना पाकिस्तानी खेळाडूंशी हँडशेक न करण्याचा सल्ला दिला होता. कट्टर प्रतिस्पर्ध्यांशी कोणत्याही प्रकारची चर्चा करू नये, अशी सूचना केली. जम्मू-काश्मीरमधील पहलगाममध्ये काय घडलं? ते विसरू नका, हे सांगण्यात आलं होतं. मैदानावर उतराल तेव्हा फक्त तुमचे सर्वोत्तम प्रदर्शन करा आणि भारतासाठी जिंका. असंही सांगण्यात आलं होतं. सूर्यकुमार यादवनं टॉसनंतर पाक कॅप्टन सलमान आगासोबत हस्तांदोलन टाळलं. संपूर्ण मॅचमध्येही भारतीय खेळाडू पाकच्या खेळाडूशी बोलले नाहीत. मॅच संपल्यानंतरही सूर्यकुमार यादव आणि शिवम दुबेनं हस्तांदोलन केलं नाही

पाकिस्तानी क्रिकेट बोर्डाची तक्रार

क्रिकेट सामन्यामध्ये नाणेफेकीवेळी कर्णधारांनी एकमेकांशी हस्तांदोलन करणं हे खेळभावनेचं प्रतिक मानलं जातं. मात्र टीम इंडियानं मॅचपूर्वी आणि मॅच संपल्यावरही हस्तांदोलनासाठी पुढाकार घेतला नाही. रडक्या पाकिस्तान क्रिकेट बोर्डानं आशियाई क्रिकेट परिषदेकडे तक्रार केली आहे

टीम इंडियाकडून खेळ भावनेचा अनादर झाल्याा दावा पाक संघाचनं केलाय, तसंच मॅच रेफ्री अँडी पायकॉफ्ट यांच्या विरोधातही पीसीबीची तक्रार करण्यात आली आहे. टॉसच्यावेळी दोन्ही कॅप्टनही हँडशेक करू नये, अशी विनंती पायकॉफ्ट यांनी केल्याचा तक्रारीत उल्लेखआयसीसीच्या नियम पुस्तिकेमध्ये खेळाडूंनी हस्तांदो करण्यात आलाय. हास्तांदोलन केलंच पाहिजे, असा नियम नाही, त्यामुळं भारताला नियमानुसार दंड ठोठावता येणार नाही

राजकीय मॅच निकालानंतरही सुरुच

भारत-पाकिस्तान मॅचपूर्वी ठाकरेंची शिवसेना आणि भाजपात रंगलेला सामना मॅचनंतरही सुरुच आहे. भारतीय क्रिकेट संघाची देखील हा सामना न खेळण्याची भूमिका होती, मात्र त्यांच्यावर सरकारचा दबाव होता असा आरोप संजय राऊतांनी केला. तर उद्धव ठाकरेंनी उद्यापासून आलेपाक देखील खाणं बंद करावं असा टोला मंत्री आशिष शेलारांनी लगावलाय.

दीड लाख कोटी सट्ट्याचा आरोप

भारत आणि पाकिस्तान मॅचवर दीड लाख कोटींचा जुगार खेळायला गेला यात पाकिस्तानलासुद्धा 1 हजार कोटी मिळाले असां खळबळजनक दावा संजय राऊतांनी केलाय. तर राऊतांनी पाकिस्तानच्या विजयावर पैसे लावले असणार असं प्रत्युत्तर भाजपा प्रवक्ते नवनाथ बन यांनी दिलंय.

राजकारणासाठी मॅचचा बहाणा?

विरोधानंतरही भारत-पाकिस्तानशी सामना सुरळीत पार पडला. अनेक भारतीयांनी टीव्ही समोर बसून ही मॅच बघितली. कर्णधार सूर्यकुमार यादवसह भारतीय खेळाडूंनी हस्तांदोलन टाळत पाकिस्तानला जागा दाखवली. मात्र इथे प्रश्न पडतो, की नेमकं चुकलं कोण? मॅच खेळवणारे की मॅचचं राजकारण करणारे? राजकारण करण्यासाठी भारत-पाक मॅचचा बहाणा शोधला गेला का? हे प्रश्न यानिनित्तानं उपस्थित होतोय


About Author

Smita Gangurde

Other Latest News