दुबई – पाकिस्तान विरुद्ध टीम इंडियाच्या उत्कठांवर्धक सामन्यात टीम इंडियानं पाकिस्तानचा सात विकेट्स राखून दणदणीत पराव केला आहे. पाकिस्ताननं सुरुवातीपासूनच या मॅचमध्ये शस्त्र खाली टाकल्याचं दिसतं होतं. पाकिस्ताननं टॉस जिंकून पहिल्यांदा बॅटिंगचा घेतलेला निर्णय त्यांच्या अंगलट आल्याचं दिसलं. अवघ्या 127 रन्सचं टार्गेट 20 ओोव्हर्समध्ये टीम इंडियाला देण्यात आलं मात्र टीम इंडियानं अवघ्या सोळाव्या ओव्हरमध्ये विजय संपादित केला आहे.
एशिया कपमध्ये टीम इंडियानं विजय मिळवत पाकिस्तानला क्रिकेटमध्येही त्यांची जागा दाखवून दिल्याचं सांगण्यात येतंय. 28 रन्सच्या टार्गेटला चेस करताना टीम इंडियानं 10 ओव्हरमध्ये 2 विकेट्स गमावून 93 रन्स केल्या होत्या. त्यानंतर कॅप्टन सूर्यकुमारनं साजेशी कामगिरी केली आहे. 13 ओोव्हरमध्ये दोन गडी बाद झाल्यानंतरही टीम इंडियानं सेंच्युरी गाठली होती.

पाकिस्तानी क्रिकेटर्सची तारांबळ
पहिल्या 16 ओव्हर्समध्येच पाकिस्तानी क्रिकेटर्सची तारांबळ उडाताना पाहायला मिळतेय. पाकिस्तानी क्रिकेटर्स एकापाठोपाठ एक असे बाद झाले. साहीबजादा फरहाननं 40 तर शाहीन शाहनं 33 रन्स केले. जसप्रीत बुमराह आणि अक्षर पटेल या दोन्ही भारतीय बॉलर्सनी दोन-दोन विकेट्स काढल्यात.
भारतीय बॉलर्सची धमाकेदार कामगिरी
भारतीय बॉलर्सनी अत्यंत चांगली कामगिरी करत पहिल्या 17 ओव्हरमध्येच पाकिस्तानच्या 7 विकेट्स काढल्या आहेत. 19 व्या ओव्हरपर्यंत 9 विकेट्स गमवाव्या लागल्या आहेत. पाकिस्तानची टीमनं 20 ओव्हर्समध्ये केवळ 127 रन्स केल्यात.
सूर्यानं पाकिस्तानीशी शेकहँड करण्याचं टाळलं
टॉस झाल्यानंतर कॅप्टन सूर्यकुमार यादव आणि पाकिस्तानी कॅप्टन सलमान अली आगा यांनी एकमेकांशी हस्तांदोलन केलं नाही. दोघांनी एकमेकांकडे बघण्याचंही टाळलं. आंतरराष्ट्रीय मॅचेसमध्ये टॉसच्या वेळी एकमेकांनशी बोलण्याची आणि एकमेकांना हस्तांदोलन करण्याची परंपरा आहे. मात्र पहलगाम हल्ल्यानंतर होत असलेल्या या मॅचमध्ये टीम इंडियाच्या कॅप्टननं पाकिस्तानी टीमला त्यांची जागा या निमित्तानं दाखवून दिलीय.
टीम इंडिया आणि पाकिस्तान टीमचे प्लेयर्स
टीम इंडिया- सूर्यकुमार यादव (कॅप्टन), शुभमन गिल, संजू सॅमसन, तिलक वर्मा, शिवम दुबे, हार्दिक पंड्या, अक्षर पटेल,अभिषेक शर्मा, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह आणि वरुण चक्रवर्ती.
पाकिस्तान टीम- सलमान आगा (कॅप्टन), सॅम अयुब, साहिबजादा फरहान, मोहम्मद हॅरिस , फखर जमान, हसन नवाज, मोहम्मद नवाज, फहीम अश्रफ, शाहीन आफ्रिदी, अबरार अहमद आणि सुफयान मुकीम











