आशिया कपमधून रेफरी हटवण्याची पाकिस्तानची मागणी फेटाळली, पाकिस्तान टीम बाहेर पडणार?

टॉस झाल्यानंतर रेफरींनी दोन्ही कॅप्टन्सना शेक हँड करण्यास सांगितलं नाही, टीम इंडियाच्या दबावातून रेफरींनी ही भूमिका घेतल्याचा आक्षेप पाकिस्तानच्या टीमनं घेतला होता.

दुबई- आशइया कपमधील रेफरी एंडी पायक्रॉफ्ट यांना हटवण्याची पाकिस्तान क्रिकेट बोर्डाची मागणी आयसीसीनं फेटाळली. 14 सप्टेंबरला झालेल्या भारत-पाकिस्तान मॅचमध्ये टीम इंडियाच्या क्रिकेटर्सनी आणि पाकिस्तानी क्रिकेटर्सनी शेक हँड केलं नव्हतं. पाकिस्तान क्रिकेट बोर्डानं यासाठी मॅचचे रेफरी जबाबदार असल्याचं सांगितलं होतं.

भारतीय टीमनं हा निर्णय अचानक घेतलेला नव्हता, असंही आता समोर येतंय. बीसीसीआय आणि सरकार या दोघांचीही या निर्णयाला सहमती होती. मॅच तर होईल पण मैत्रीपूर्ण व्यवहार होणार नाही, अशी भूमिका भारतानं घेतल्याचं दिसतंय.

संपूर्ण टुर्नामेंटमध्ये टीम इंडियाची भूमिका कायम

पाकिस्तानी क्रिकेटर्सशी शेक हँड न करण्याची भूमिका पूर्ण आशिया कपमध्ये असेल. क्रिकेटर्स, बीसीसीआय आणि केंद्र सरकार यांच्यात याबाबत एकमत असल्याचं सांगण्यात येतंय. बीसीसीआय़ची अधिकृत भूमिका याबाबत आलेली नाही. मात्र टीम इंडिया फायनलमध्ये पोहचली आणि फायनल जर टीम इंडियानं जिंकली, तर पाकिस्तानी क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष मोहसिन नकवी यांच्या हस्ते ट्रॉफी स्वीकारणार नाही, अशी भूमिका टीम इंडियानं याआधीच घेतलेली आहे. नकवी सध्या एशियन क्रिकेट काऊन्सिलचेही अध्यक्ष आहेत.

भारत आणि पाकिस्तानमध्ये पुन्हा होणार मॅच

टीम इंडिया आणि पाकिस्तानी टीम सुपर 4 राऊंडमध्ये पुन्हा आमनेसामने येण्याची शक्यता आहे. असं झाल्यास 21 सप्टेंबरला होणाऱ्या मॅचमध्येही शेक हँड न करण्याची भूमिकाच टीम इंडियाची राहील असं सांगण्यात येतंय. मात्र यासाठी पाकिस्तानला दुबईच्या क्रिकेट टीमचा पराभव करावा लागणार आहे.

पाकिस्ताननं रेफरींवर फोडलं खापर

टीम इंडियानं शेक हँड केलं नाही याची तक्रार पाकिस्तानकडून रेफरींकडे करण्यात आली. खेळ भावनेतून टीम इंडिया खेळत नसल्याचा आरोपही करण्यात आला. टॉस झाल्यानंतर रेफरींनी दोन्ही कॅप्टन्सना शेक हँड करण्यास सांगितलं नाही, टीम इंडियाच्या दबावातून रेफरींनी ही भूमिका घेतल्याचा आक्षेप पाकिस्तानच्या टीमनं घेतला होता.

आयसीसीच्या निर्णयानंतर पाकिस्तानी टीम बाहेर पडणार

रेफरींना हटवण्याची मागणी आयसीसीनं फेटाळल्यानंतर आता पाकिस्तान टीम या सीरिजमधून बाहेर पडणार का, याकडं सगळ्याचं लक्ष लागलेलं आहे. एशियन क्रिकेट कौन्सिल आणि बीसीसीआयनं याबाबत अद्याप कोणतीही भूमिका जाहीर केलेली नाही.

पाकिस्तानचे माजी क्रिकेटर्सचीही वादात उडी

या हँडशेक वादात पाकिस्तानच्या माजी क्रिकेटर्सनीही उडी घेतलीमाजी कॅप्टन रशिद लतीफ यानं पहलगमाचा मुद्दा असेल तर भारतानं आमच्याशी युद्धकरावं, पण क्रिकेटमध्ये या बाबी आमू नयेत, अशी प्रतिक्रिया दिलीय. तर शाहिद अफ्रीदी यानं क्रिकेटला क्रिकेटच राहू द्या, त्यात राजकारण आणू नका, अशी प्रतिक्रिया दिलीय.


About Author

Smita Gangurde

Other Latest News