Parth Pawar: पार्थ पवारांवर जमीन घोटाळ्याचे आरोप, अजित पवार गप्प, प्रकरण नेमकं काय?

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे ज्येष्ठ पुत्र पार्थ पवार यांच्या मालकीच्या कंपनीने पुण्यातील हायप्रोफाईल अशा कोरेगाव आयटी पार्क परिसरातील सरकारी जमीन कमी किंमतीत खरेदी केल्याचा आरोप करण्यात येतोय.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार पुण्यातील उच्चभ्रू कोरेगावमधील महार वतनाच्या जमिनीवरून चांगलेच अडचणीत आले आहेत. महार वतनाची असलेली तब्बल 1800 कोटींची जमीन फक्त 300 कोटी रुपयांमध्ये डल्ला मारल्याचा आरोप पार्थ पवार यांच्यावर होत आहे. या आरोपानंतर आता राज्यामध्ये एकच खळबळ उडाली. स्वत: उपमुख्यमंत्री अजित पवार देखील या प्रकरणात पूर्णपणे गप्प असल्याचे दिसत आहे. अशा परिस्थितीत नेहमी पुढे होऊन बोलणारे अजितदादा काय का बोलत नाहीत? असा सवाल देखील उपस्थित केला जात आहे. त्यामुळे हे प्रकरण नेमकं काय, आरोप काय होत आहेत, ते जाणून घेऊ…

1,800 कोटींची जमीन 300 कोटींत खरेदी?

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे ज्येष्ठ पुत्र पार्थ पवार यांच्या मालकीच्या कंपनीने पुण्यातील हायप्रोफाईल अशा कोरेगाव आयटी पार्क परिसरातील सरकारी जमीन कमी किंमतीत खरेदी केल्याचा आरोप करण्यात येतोय. या जमिनीचा बाजारभाव तब्बल 1800 कोटी होता. पण पार्थ पवारांच्या कंपनीने ही जमीन 300 कोटीत घेतल्याचा आरोप करण्यात आला आहे. या आरोपांबाबत अजित पवार यांना प्रश्न विचारण्यात आला.

अजित पवार यांनी याबाबत आज पत्रकारांना कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. अजित पवार यांना पत्रकारांनी प्रश्न विचारले असता अजित पवार काहीही न बोलता निघून गेले. यामुळे पार्थ पवार यांच्याबाबत करण्यात आलेल्या आरोपांचा नेमका अर्थ काय समजायचा? असा प्रश्न उपस्थित होत आहे. ऐन स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या काळात अजित पवारांच्या अडचणी वाढण्याची चिन्हे आता दिसत आहेत.

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी काय रणणीती आखावी यासाठी या बैठका पार पडत आहेत. स्वत: उपमुख्यमंत्री अजित पवार आणि खासदार सुनील तटकरे या बैठकीत आपल्या नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करत आहेत. या दरम्यान एक धक्कादायक बातमी आज सकाळपासून चर्चेत आहे.

सुप्रिया सुळेंची प्रकरणात उडी; म्हणाल्या…

कोरेगाव आयटी पार्क परिसरातील 1800 कोटी किंमतीची सरकारी जमीन अवघ्या 300 कोटीत खरेदी केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी मुख्यमंत्र्यांनी संबंधित तहसीलदार आणि तलाठींवर कारवाई केली आहे. पण या कारवाईवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. तहसीलदार आणि तलाठी आपण सही केलेली नाही, असं सांगत आहेत. मग त्यांच्यावर कारवाई का? असा सवाल सुप्रिया सुळे यांनी केला आहे. तसेच पार्थ पवारांवरील आरोपांवरही त्यांनी फार बोलणं टाळलं आहे. सुप्रिया सुळे यांनी या प्रकरणावरुन राज्य सरकारवर निशाणा साधला आहे.

सुप्रिया सुळे म्हणाल्या की, माझा पार्थवर विश्वास असून तो चुकीची गोष्ट करणार नाही. मुख्यमंत्री म्हणाले की, मी या प्रकरणाची चौकशी करणार आहे. तहसिलदारांचं निलंबन करण्यात आलं आहे. हे बनाना रिपब्लिक असल्याची टीका त्यांनी केली.  त्यांनी सांगितले की, सरकार म्हणत आमची जमीन विकता येत नाही. तहसीलदार म्हणतात मी सही केली नाही. मग दोषी कोण? असा सवाल सुळेंनी उपस्थित केला आहे.


About Author

Rohit Shinde

Other Latest News