Manoj Jarange Patil : जरांगेंच्या हत्येचा कट कोणी रचला?? स्वतःच सांगितलं की….

एका खूप मोठ्या व्यक्तीने हे षडयंत्र रचलं आहे. मी उद्या सकाळी अकरा वाजता सविस्तर बोलतो, ज्याने कुणे ही केलं आहे ते पुराव्यासह आपण मांडू

मराठा आरक्षणासाठी सातत्याने आक्रमक भूमिका मांडणाऱ्या मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांची हत्या करण्याचा कट उघडकीस आला आहे. जरांगे यांना संपवण्यासाठी साठी तब्बल अडीच कोटीची सुपारी देण्यात आली होती. याप्रकरणी पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेतला आहे. मनोज जरांगे पाटील यांची हत्या करण्याचा प्लॅन नेमका आखला तरी कोणी ??याबाबत राजकीय वर्तुळात तर्क वितर्क लावले जात आहेत. याबाबत खुद्द विचारांगी पाटील यांना विचारलं असता त्यांनी स्पष्ट उल्लेख केला नसला तरी उद्याच्या पत्रकार परिषदेत आपण खुलासा करणार असल्याचे त्यांनी म्हटलं आहे.

काय म्हणाले जरांगे पाटील (Manoj Jarange Patil)

याबाबत मनोज जरांगे पाटील म्हणाले, हे सत्य आहे की कट शिजवला गेला. हत्या घडवून आणणं किंवा घातपात करणे हे सर्व कोण करत आहे हे समोर येईलच. जालना जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक या प्रकरणात लक्ष घालून आहेत. एका खूप मोठ्या व्यक्तीने हे षडयंत्र रचलं आहे. मी उद्या सकाळी अकरा वाजता सविस्तर बोलतो, ज्याने कुणे ही केलं आहे ते पुराव्यासह आपण मांडू असे  मनोज जरांगे म्हणाले आहेत. तसंच वेळ आली तर समाजासाठी रक्त सांडायला तयार आहे असेही त्यांनी म्हटले.

नेमकं काय आहे प्रकरण

मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्या हत्येचा कट रचण्यासाठी बीड शहरात काही बैठका झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. धक्कादायक बाब म्हणजे यामध्ये जरांगे पाटलांच्या एका सहकाऱ्यासह अन्य एका व्यक्तीचा समावेश होता. ही माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तातडीने तपास केला आणि दोन आरोपींना ताब्यात घेतलं. दादा गरुड आणि अमोल खुणे अशी आरोपींची नावे आहेत. पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार, एका मोठ्या राजकीय नेत्याने जरांगे पाटील यांना संपवण्याचा हा कट रचल्याची कबुली ताब्यात घेतलेल्या आरोपींनी दिली आहे.


About Author

Asavari Khedekar Burumbadkar

Other Latest News