पार्थ पवार ‘ती’ वादग्रस्त जमीन शासनाला परत करण्याची शक्यता; व्यवहार तुर्तास थांबण्याची चिन्हं

मुंढवा जमीन खरेदी प्रकरणात अनियमितता झाल्याचं स्पष्ट झालं आहे. प्रकरण अंगलट येण्याची चिन्हं दिसत असल्याने हा व्यवहार तुर्तास थांबण्याची शक्यता आहे.

पार्थ पवारांच्या जमीन गैरव्यवहाराच्या संदर्भाच एक मोठी बातमी समोर येत आहे. पार्थ पवार यांच्याकडून मुंढवा येथील वादग्रस्त जमीन शासनाकडे परत करण्याची शक्यता वर्तवली जातेय. मुंढवा जमीन खरेदी प्रकरण अजित पवार यांच्या अंगलट येण्याची शक्यता असल्यानं पार्थ पवार जमीन शासनाकडे परत  करण्याची शक्यता आहे. मुंढवा जमीन खरेदी प्रकरणात अनियमितता झाल्याचं स्पष्ट झालं आहे. प्रकरण अंगलट येण्याची चिन्हं दिसत असल्याने हे प्रकरण तुर्तास थांबण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत विरोधकांकडून मात्र पार्थ पवार आणि अजित पवारांवर टीकेची झोड उठवली जात आहे.

प्रकरणाची सखोल चौकशी होणार ?

मुंढवा जमीन खरेदी गैरव्यवहार प्रकरणी चौकशी समितीचा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. महसूल विभागाचे अप्पर मुख्य सचिव विकास खारगेंच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली आहे.अपर मुख्य सचिवांसोबत आणखी 5 जणांचा समितीत समावेश आहे. पुढील एका महिन्यात चौकशी करत अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

प्रकरण अंगलट म्हणून काढता पाय?

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी प्रकरण अंगाशी आल्यानंतर जमीन परत करण्याचं सूचत आहे. जैन बोर्डिंग प्रकरणात आल्यानंतर मोहोळांनी जमीन परत करण्याचं ठरवलं. जमीन परत केली जाईल यावर ही गोष्ट भागते का? याच्यावर काहीच कारवाई केली जाणार नाही का? असा सवाल सुषमा अंधारे यांनी केला.

शासनाचा कोट्यवधींचा महसूल बुडीत

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे ज्येष्ठ पुत्र पार्थ पवार यांच्या मालकीच्या कंपनीने पुण्यातील हायप्रोफाईल अशा कोरेगाव आयटी पार्क परिसरातील सरकारी जमीन कमी किंमतीत खरेदी केल्याचा आरोप करण्यात येतोय. या जमिनीचा बाजारभाव तब्बल 1800 कोटी होता. पण पार्थ पवारांच्या कंपनीने ही जमीन 300 कोटीत घेतल्याचा आरोप करण्यात आला आहे. या आरोपांबाबत अजित पवार यांना प्रश्न विचारण्यात आला. दुसरीकडे यामध्ये शासनाची तब्बल 21 कोटींची स्टॅम्प ड्युटी पार्थ पवारांनी बुडविल्याचा आरोप देखील करण्यात येत आहे. त्यामुळे या प्रकरणात पुढील काळात आणखी मोठा ट्वीस्ट येण्याची शक्यता आहे.


About Author

Rohit Shinde

Other Latest News