Tulsi Plant : चुकूनंही ‘या’ दिवशी तुळशीची पानं तोडू नये; जाणून घ्या..

वास्तुशास्त्रात वनस्पतीशी संबंधित अनेक नियम सांगितले आहेत त्यापैकी एक म्हणजे तुळस. तुळशीचे पाने तोडण्याबाबतही अनेक नियम वास्तूशास्त्रात आहेत जाणून घेऊयात...

हिंदू धर्मात तुळशीला पवित्र मानले जाते आणि त्यात देवी लक्ष्मीचा वास असतो. हिंदू धर्मात तुळशीच्या रोपाला खूप महत्त्व आहे. त्याची पाने धार्मिक विधींमध्ये मोठ्या प्रमाणात वापरली जातात. पण तुळशीची पाने तोडण्याचे काही नियम आहेत. जाणून घेऊयात…

या दिवशी तुळशीची पाने तोडू नका

शास्त्रानुसार, तुळशीची पाने तोडताना काही विशेष नियम पाळणे आवश्यक आहे, जसे की रविवार, मंगळवार, एकादशी, अमावस्या, पौर्णिमा, सूर्य/चंद्रग्रहण, या दिवशी पाने तोडू नयेत, कारण या दिवशी तुळशीला व्रत किंवा इतर कारणांमुळे स्पर्श करणे वर्ज्य मानले जाते.

संध्याकाळी तुळशी तोडू नका

सूर्यास्तानंतर पाने तोडू नयेत, असे सांगितले जाते, कारण या वेळी तुळशी माता श्रीकृष्णासोबत रासलीलेत मग्न असते.

नखांनी तुळशीची पाने तोडू नये

नखांनी तुळशीची पाने तोडणे अशुभ मानले जाते. शास्त्रानुसार, तुळशीची पाने तोडताना ती नखांनी तोडू नयेत, हलक्या हाताने तोडावीत. तुळशीला भगवान विष्णूंची प्रिय मानले जाते, म्हणून तिला आदरपूर्वक हाताळणे आवश्यक आहे.

आंघोळ न करता स्पर्श करू नये

तुळशीच्या रोपात देवी लक्ष्मीचा वास असतो, म्हणून सकाळी आंघोळ करून स्वच्छ झाल्यावरच तुळशीला स्पर्श करावा, असे न केल्यास ते अशुभ मानले जाते.

(टीप : वरील सर्व बाबी MP मराठी Breaking  केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून MP मराठी Breaking  कोणताही दावा करत नाही.)


About Author

Asavari Khedekar Burumbadkar

Other Latest News