आषाढी एकादशीची पूजा कधी कराल? योग्य तिथी आणि शुभमुहूर्त काय?

आषाढी एकादशी, देवशयनी किंवा हरिशयनी एकादशी 5 की 6 जुलै नेमकी कधी आहे, याबद्दल काही भक्तांमध्ये संभ्रम आहे. जाणून घ्या योग्य तिथी, शुभ मुहूर्त....

दरवर्षी आषाढ महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकदाशी तिथीला देवशयनी किंवा आषाढी एकादशीचा उत्सव असतो. हा दिवस भगवान विष्णूला समर्पित असून महाराष्ट्रात विष्णूचे अवतार विठ्ठलाची आराधना करण्यात येते. देवशयनी एकादशी हिंदू धर्मात खूप महत्वाची मानली जाते. हा एक अतिशय पवित्र दिवस आहे, जो दानधर्मासाठी खूप खास मानला जातो. या दिवशी भगवान विष्णू 4 महिन्यांसाठी योगनिद्रामध्ये जातात. हा काळ 4 महिन्यांचा असतो, म्हणूनच त्याला चातुर्मास म्हणतात. देवशयनी एकादशीनंतर कोणतेही शुभ कार्य केले जात नाही. देवशयनी एकादशी यंदा 5 की 6 जुलै नेमकं कधी आहे. शुभ मुहूर्त, पूजा साहित्य आणि पूजा विधी जाणून घ्या…

देवशयनी किंवा आषाढी एकादशी कधी?

हिंदू पंचांगानूसार एकादशी तिथी ही 5 जुलै रोजी संध्याकाळी 6 वाजून 58 मिनिटांनी सुरू होईल. ते 06 जुलै रोजी रात्री 9 वाजून 14 मिनिटांनी संपेल. उदय तिथीनुसार 6 जुलै 2025 रोजी एकादशीचे व्रत केले जाणार आहे. यामुळे यंदा आषाढी एकदाशी 6 जुलै म्हणजेच रविवारी असणार आहे.

शुभ मुहूर्त

  • ब्रह्म मुहूर्त – पहाटे 4.08 वाजेपासून ते पहाटे 4.49 वाजेपर्यंत
  • अभिजित मुहूर्त – सकाळी 11.58 वाजेपासून ते दुपारी 12.54 वाजेपर्यंत
  • विजय मुहूर्त – दुपारी 2.45 वाजेपासून ते दुपारी 3.40 वाजेपर्यंत
  • गोधुली मुहूर्त – संध्याकाळी 7.21 वाजेपासून ते संध्याकाळी 7.42 वाजेपर्यंत
  • अमृत काळ – दुपारी 12.51 वाजेपासून ते दुपारी 2.38 वाजेपर्यंत
  • त्रिपुष्कर योग – रात्री 9.14 वाजेपासून ते रात्री 10.42 वाजेपर्यंत

पंचांगानुसार देवशयनी एकादशीचा उपवास 7 जुलैला सकाळी 05:29 ते 08:16 पर्यंत सोडता येणार आहे. या दिवशी द्वादशी तिथी रात्री 11 वाजून 10 मिनिटांनी संपेल, म्हणून सकाळी व्रत सोडणे शुभ मानले जाते.

पूजा विधी

आषाढी एकादशीला संपूर्ण दिवस उपवास असतो. सकाळी उठल्यावर स्नान करुन घरातील देवाची पूजा करा. त्यानंतर विठुराच्या मूर्तीला पंचामृताने स्नान घाला. आता स्वच्छ कपड्याने मूर्ती पुसून तिला अष्टगंध लावा. विठुरायाला नवीन वस्त्र परिधान करा आणि हार घाला. उपवासाच्या पदार्थांचा किंवा फळांचा नैवेद्य दाखवा. विठुरायाची आरती करा. आषाढी एकादशीला तुळस तोडू नयेत. पण आदल्या दिवशी तुळस तोडून ठेवा आणि ती विठुरायाला अर्पण करावी.

(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)


About Author

Asavari Khedekar Burumbadkar

Other Latest News