वास्तू शास्त्रात तुमच्या किचनसंबंधित काही नियम सांगितले आहेत. त्याचे उल्लंघन केल्यास अनेक संकटे येऊ शकतात. यातीच एक प्रथा आहे ती म्हणजे गरम तव्यावर पाणी न टाकणे. गरम तव्यावर पाणी टाकल्यास अनेक संकटे येऊ शकतात. आज आपण या बद्दल जाणून घेणार आहोत.
गरम तव्यावर पाणी का टाकू नये?
गरम तव्यावर पाणी टाकणे वास्तुशास्त्रानुसार अशुभ मानले जाते. कारण यामुळे लक्ष्मीची अवकृपा, घरात नकारात्मक ऊर्जा, आर्थिक समस्या आणि कुटुंबातील सदस्यांच्या आयुष्यात अडथळे येऊ शकतात, म्हणून असे करणे टाळावे असे ज्योतिष आणि वास्तु तज्ञ सांगतात.

नकारात्मक ऊर्जा
गरम तव्यावर पाणी टाकल्यावर जो तडतड आवाज येतो, तो घरात नकारात्मक ऊर्जा आणतो, ज्यामुळे सुख-समृद्धी नष्ट होते.
लक्ष्मीचा प्रकोप
यामुळे देवी लक्ष्मी नाराज होते आणि कुटुंबात आर्थिक अडचणी येतात, असे सांगितले जाते. गरम तव्यावर पाणी टाकल्यास देवी लक्ष्मी रुसते, ज्यामुळे घरात पैशांची चणचण निर्माण होते आणि आर्थिक नुकसान होते. असे केल्याने कुटुंबात अचानक आर्थिक समस्या येतात आणि पैशांची आवक थांबते.
राहू-चंद्राचा प्रभाव
तज्ज्ञांच्या मते, यामुळे राहू आणि चंद्र यांचा अशुभ प्रभाव वाढतो. स्वयंपाकघरातील तवा राहू ग्रहाचे प्रतीक मानला जातो. गरम तव्यावर पाणी टाकल्याने राहू ग्रहाचा अशुभ प्रभाव वाढतो, ज्यामुळे घरात कलह, पैसा कमी होणे आणि कुटुंबात दुःख येऊ शकते, असे मानले जाते. गरम तव्यावर पाणी टाकणे राहू आणि चंद्र या ग्रहांना असंतुलित करते, ज्यामुळे घरात समस्या निर्माण होतात.
आरोग्य आणि सुख-समृद्धी
या चुकीच्या कृतीमुळे घरात आजारपण पसरते आणि सुख-समृद्धी कमी होते, असे मानले जाते. यामुळे घरातील अविवाहित व्यक्तींच्या लग्नात अडथळे येतात किंवा कुटुंबातील सदस्यांच्या आरोग्यावर वाईट परिणाम होतो.
(टीप : वरील सर्व बाबी MP मराठी Breaking केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून MP मराठी Breaking कोणताही दावा करत नाही.)











