प्रत्येक व्यक्ती आपल्याजवळ एक पर्स आणि पाकीट ठेवत असते. पण तुम्ही कधी लक्षात घेतले आहे का की अनेक लोक पैशांव्यतिरिक्त इतर अनेक गोष्टी आपल्या पर्समध्ये ठेवतात, ज्याचा आपल्या जीवनावर खोलवर परिणाम होतो. चला जाणून घेऊया आपल्या पर्समध्ये कोणत्या वस्तू ठेवू नयेत…
पर्समध्ये पितरांचे फोटो ठेवू नयेत
वास्तुशास्त्रानुसार, मृत नातेवाईक किंवा पितरांचे फोटो ठेवू नयेत, कारण हे आर्थिक संकटाचे कारण ठरू शकते. कारण या गोष्टी नकारात्मक ऊर्जा आणतात, आर्थिक संकट निर्माण करतात. ज्यामुळे पैशांची आवक थांबते आणि नुकसान होते.

जुनी बिले आणि कागदपत्रे
पर्समध्ये अनावश्यक कागदपत्रे आणि जुनी बिले ठेवू नका, कारण यामुळे पैशांची बचत होत नाही. खरेदीची बिले किंवा जुने कागद ठेवल्याने नकारात्मकता येते आणि पैसे टिकत नाहीत.
फाटलेले पाकीट
फाटलेले किंवा खराब झालेले पाकीट वापरू नका, यामुळे नकारात्मक ऊर्जा येते आणि पैशांचे नुकसान होते, या गोष्टी नकारात्मक ऊर्जा देतात आणि आर्थिक नुकसानीस कारणीभूत ठरतात.
चावी
पर्समध्ये चाव्या ठेवल्याने दारिद्र्य येते आणि नकारात्मक ऊर्जा वाढते, असे मानले जाते. पर्समध्ये चाव्या किंवा तीक्ष्ण वस्तू कधीही ठेवू नका. असे केल्याने खर्च वाढतो. पर्समध्ये लोखंडी वस्तू ठेवू नका.
देवांचे फोटो
पर्समध्ये देवांचे फोटो ठेवू नये. असे केल्याने देवतांचा अपमान होतो.
(टीप : वरील सर्व बाबी MP मराठी Breaking केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून MP मराठी Breaking कोणताही दावा करत नाही.)











