Nanded To Mumbai Flight: नांदेडकरांसाठी मोठी आनंदाची आणि दिलासादायक बातमी समोर आली आहे. येत्या २५ डिसेंबर पासून नांदेड ते मुंबई थेट विमानसेवा सुरु होणार आहे. या विमानसेवेसाठी तिकीट विक्रीला सुरुवात झाली असून अनेकांनी मुंबईचे तिकीट बुक केलं आहे. भाजप खासदार अशोक चव्हाण यांनी सोशल मीडियावर याबाबत माहिती दिली आहे. या नव्या विमानसेवेमुळे नांदेडकराना अगदी जलद पद्धतीने मुंबई गाठता येणार आहे. खास करून व्यासायिकांना या विमानसेवेचा मोठा फायदा होईल.
काय म्हणाले अशोक चव्हाण ?
नांदेड, हिंगोली, परभणी, लातूर, वाशिम, हिंगोली अशा सर्व जिल्ह्यातील प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहे. मुंबई- नांदेड- मुंबई विमानसेवा येत्या २५ डिसेंबरपासून सुरू होत असून, स्टार एअर कंपनीच्या वेबसाईटवर बुकिंग सुरू झाली आहे. ही विमानसेवा नोव्हेंबर मध्येच नियोजित होती. मात्र तांत्रिक कारणांमुळे त्यास विलंब झाला. मुंबई- नांदेड- मुंबई ही विमानसेवा तूर्तास मंगळवार, गुरुवार आणि शनिवारी उपलब्ध असेल परंतु, लवकरच ही विमानसेवा दररोज उपलब्ध राहिल. नांदेड- मुंबई विमानसेवा सुरू करण्यासाठी मुख्यमंत्री ना. देवेंद्रजी फडणवीस, केंद्रीय नागरी उड्डयन मंत्री के राममोहनजी नायडू, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधरजी मोहोळ यांचे सहकार्य लाभले. त्यासाठी मी त्यांचा आभारी आहे अशी माहिती अशोक चव्हाण यांनी दिली. Nanded To Mumbai Flight

खरं तर सुमारे दीड वर्षापूर्वी स्टार एअर विमान कंपनीने नांदेड येथून विविध ठिकाणी हवाई सेवा सुरू केली. तेव्हापासून नांदेड ते मुंबई या मार्गावर विमानसेवा असावी, अशी मागणी जोर धरते आहे. यापूर्वी वेगवेगळ्या कंपन्यांची विमानसेवा सुरू होती, तेव्हा मुंबईची सेवा आवर्जून होती, परंतु यावेळी मुंबई विमानतळावर स्लॉट उपलब्ध नसल्याचे कारण पुढे करण्यात येत होते. आता मात्र २५ डिसेंबर पासून नांदेडवरून मुंबईसाठी विमानाचे उड्डाण होईल. सध्या नांदेड विमानतळावरून पुणे, हैदराबाद, बंगळुरू, अहमदाबाद, दिल्लीला विमान टेक ऑफ घेतात आता यात मुंबई शहराचाही समावेश झाला आहे. या विमानसेवेमुळे फक्त नांदेडलाच नव्हे परभणी, हिंगोली आणि लातूर जिल्ह्यातील लोकांनाही फायदा होणार आहे खास करुन व्यापारी वर्गासाठी ही विमानसेवा खूप जास्त फायदेशीर ठरणार आहे. कामानिमित्त मुंबईला जाणाऱ्या प्रवाशांच्या वेळेची आता बचत होणार आहे.
कसे असेल वेळापत्रक ? Nanded To Mumbai Flight
हे विमान मुंबईहून दुपारी 4.25 ला नांदेडसाठी उड्डाण करेल तर नांदेडवरून संध्याकाळी 5.40 वाजता लैंड होईल त्यानंतर नांदेडहून संध्याकाळी 6.10 ला मुंबईसाठी उड्डाण घेईल विमान जे संध्याकाळी 7.25 ला ते मुंबईत पोहोचेल.
नांदेड मुंबई विमान तिकीट किती?
नांदेड – मुंबई विमानाचे तिकीट तुम्हाला बूक करायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला 3 हजार मोजावे लागणार आहे











