देवशयनी एकादशी हिंदू धर्मात खूप विशेष मानली जाते. यावर्षी देवशयनी एकादशी 6 जुलै रोजी येत आहे. देवशयनी एकादशी आषाढ महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशी तिथीला साजरी केली जाते. या दिवसापासून श्री हरि विष्णूंची निद्रा सुरू होते. या दिवशी भगवान विष्णू 4 महिन्यांसाठी योगनिद्रामध्ये जातात. हा काळ 4 महिन्यांचा असतो, म्हणूनच त्याला चातुर्मास म्हणतात. देवशयनी एकादशीनंतर कोणतेही शुभ कार्य केले जात नाही.
यावर्षी देवशयनी एकादशी विशेष आहे
देवशयनी एकादशी काही राशींसाठी खरोखरच भाग्य घेऊन येऊ शकते. यावर्षी, 6 जुलै रोजी देवशयनी एकादशी आहे आणि या दिवशी काही राशींना विशेष लाभ मिळण्याची शक्यता आहे. या दिवशी काही शुभ योग जुळून येत आहेत, ज्यामुळे या राशींच्या लोकांचे भाग्य उजळेल.
‘या’ राशी कोणत्या?
- मिथुनदेवशयनी एकादशी मिथुन राशीच्या लोकांसाठी खूप चांगली राहील. या काळात त्यांना आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे.
- सिंहसिंह राशीच्या लोकांसाठी देखील हा काळ शुभ आहे. त्यांना करिअरमध्ये प्रगती आणि यश मिळू शकते.
कन्या
देवशयनी एकादशी कन्या राशीच्या लोकांसाठी खूप शुभ आहे. या काळात त्यांना नशिबाची पूर्ण साथ मिळेल, आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे आणि करिअरमध्ये प्रगती होईल.
- मेष
- देवशयनी एकादशीला काही शुभ योग जुळून येत आहेत, ज्यामुळे मेष राशीच्या लोकांना चांगला काळ येईल.या काळात मेष राशीच्या लोकांना आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे.
देवशयनी एकादशीचे महत्व
देवशयनी एकादशीला भगवान विष्णू 4 महिन्यांसाठी योगनिद्रामध्ये जातात, त्यामुळे या दिवसाला ‘चातुर्मास’ असेही म्हणतात. या काळात शुभ आणि मंगल कार्ये करणे टाळले जाते. या दिवशी उपवास करणे, विष्णू देवाची पूजा करणे आणि दानधर्म करणे शुभ मानले जाते.
(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)












