देवशयनी एकादशीपासून चार महिन्यांपर्यंत शुभ कार्य केले जात नाही. त्यामुळे याला चातुर्मास म्हटलं जातं. या काळात लग्नासंबंधित कार्य करणे शुभ मानले जात नाही. हा देवाचा शयनकाळ किंवा निद्रेचा वेळ असतो. अशात देवं पाताळात निवास करतात अशी मान्यता आहे. चातुर्मासच्या दिवसात शुभ कार्य केले तर यश मिळत नाही असं म्हटलं जातं. या वर्षी चातुर्मास कधी संपणार, आणि यानंतर लग्नाचे किती मुहूर्त आहे, याबाबत जाणून घेऊया.
चातुर्मास २०२५ (Chaturmas 2025)
यंदाच्या वर्षा चातुर्मासाची सुरुवात ६ जुलैपासून होत आहे. यानंतर चार महिन्यांपर्यंत चातुर्मास असेल. १ नोव्हेंबर २०२५ रोजी देवउठनी एकादशी दिवशी चातुर्मास समाप्त होईल. यानंतर तुम्ही मंगल कार्य करू शकता.

चातुर्मासानंतर मंगल कार्य कधीपासून करू शकता?
चातुर्मास १ नोव्हेंबर रोजी संपेल आणि दुसऱ्या दिवशी, २ नोव्हेंबर २०२५ रोजी, तुळशी विवाहाच्या दिवशी लग्नकार्य करण्यास सुरुवात होईल. तुळशी विवाहाच्या दिवशी लग्न करणे अत्यंत शुभ आणि फलदायी मानले जाते.
चातुर्मासात लग्न का केलं जात नाही?
चातुर्मासात मंगल कार्य म्हणजे लग्न, मुंज, गृहप्रवेश आदी शुभ कार्य केली जात नाहीत. या काळात विष्णू भगवान निद्रावस्थेत राहून आराम करतात. त्यामुळे या काळात केलेल्या कामात देवाचा आशीर्वाद मिळत नसल्याची मान्यता आहे. त्यामुळे चातुर्मासात शुभ कार्य करणं योग्य मानलं जात नाही. तर ज्योतिषी कारणांनुसार, या दरम्यान ग्रहांची स्थिती अनुकूल असत नाही. गुरु किंवा शुक्राचा अस्तकाल असतो. हा ग्रह वैवाहिक जीवन आणि सुख-समृद्धीचं प्रतीक मानलं जातं. याच्या उदयाशिवाय विवाह केल्यास वैवाहित आयुष्य यशस्वी होत नाही.
नोव्हेंबर २०२५ मध्ये लग्नाचा मुहूर्त
२, ३, ६, ८, १२, १३, १६, १७, १८, २१, २२, २३, २५ आणि ३० नोव्हेंबर हे लग्न इत्यादींसाठी शुभ असतील.
डिसेंबर २०२५ चा विवाह मुहूर्त
४, ५ आणि ६ डिसेंबर हे लग्नासाठी शुभ दिवस आहेत. हे दिवस लग्नासाठी खूप शुभ मानले जातात.











