हिंदू धर्मात गणरायाला विघ्नहर्ता, बु्द्धी, समृद्धीची देवता मानलं जातं. गणपती बाप्पाच्या प्रतिमा आणि चित्रांमध्ये त्यांना वेगवेगळ्या आसनांमध्ये दाखवलं आहे. प्रत्येक मुद्रा किंवा आसन अध्यात्मिक आणि वास्तूचं महत्त्व अधोरेखित करते. जर या मुद्रांचं महत्त्व लक्षात घेऊन घरात स्थापना केली तर जीवनात सुख, शांती आणि यश मिळेल.
गणेशाच्या विविध आसनांमागील रहस्य
नृत्य करतानाचा गणेश

नृत्याच्या मुद्रेत असलेली गणेशाची प्रतिमा ऊर्जा आणि उत्साहाचं प्रतीक आहे. ही मुद्रा जीवनात आनंद, सुख, प्रगती आणते. घर किंवा कार्यालयात नृत्यरत गणेशाची स्थापना केल्यास वातावरणात सकारात्मकता राहते.
उभा असलेला गणेश
उभ्या मुद्रेत असलेला गणपती शक्ती आणि आत्मविश्वासाचं
प्रतीक आहे.ही मुद्रा साहस आणि यशाचे मार्ग उघडते. व्यवहाराच्या ठिकाणी किंवा ऑफिसमध्ये अशी प्रतीमा ठेवणं शुभ मानलं जातं.
बसलेल्या मुद्रेतील गणेश
बसलेल्या मुद्रेतील गणेश स्थिरता, शांती आणि समृद्धीचं प्रतीक आहे. ही मुद्रा जीवनात सुख, सौहार्द आणि संतुलन आमते. घरात पूजेच्या ठिकाणी बसलेल्या गणपतीची मूर्ती स्थापन करणं शुभ मानलं जातं.
निद्रा अवस्थेतील गणेश
निद्रा अवस्थेतील गणेश आराम, संतोष आणि आत्मविश्वासाचं सूचक आहे. ही मूर्ती व्यक्तीला परिश्रमासह आराम आणि मानसिक शांततेचीही गरज असते, हे दर्शवते. वास्तूनुसार, निद्रावस्थेतील गणेशाला घराच्या ड्रॉइंग रुम किंवा बेडरुममध्ये लावणं शुभ असतं.
ध्यानमग्न गणेश
ध्यानरत गणेश हे साधना, एकाग्रता आणि ज्ञानाचं प्रतीक आहे. ही मुद्रा विद्यार्थी आणि अध्यात्मिक साधकांसाठी विशेष फायदेशीर आहे. पूजेच्या खोलीत किंवा अभ्यासाच्या खोलीत ध्यानमग्न गणेशाची प्रतिमा लावल्याने मन स्थिर राहतं आणि अभ्यासात एकाग्रता वाढते.
बाल रुपातील गणेश
बाल गणपती हा निरागसता, पावित्र्य आणि नव्या सुरुवातीचे प्रतीक आहे. घरातील मुलांच्या प्रगती आणि आनंदासाठी ही मुद्रा शुभ मानली जाते. नवविवाहित जोडप्यांसाठी आणि नवीन विवाहित जीवन सुरू करणाऱ्यांसाठी हे विशेषतः शुभ आहे.
(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही.)











