Ganesh Chaturthi 2025: सनातन परंपरेत गणेश चतुर्थीच्या दिवशी विघ्नहर्ता गणेशाची पूजा अत्यंत शुभ आणि फलदायी मानली जाते. मात्र याच दिवशी चंद्राला पाहणं अशुभ का मानलं जातं? सर्वसाधारणपणे हिंदू संस्कृतीत चंद्र दर्शनाने सुख-सौभाग्याचं वरदान मिळतं, अशी मान्यता आहे. गणेश चतुर्थीला चंद्र दोष आणि त्यापासून बचाव करण्यासाठी उपायांबद्दल समजून घेऊया.
गणेश चतुर्थीला चंद्र का पाहत नाही?
हिंदू धर्मात भाद्रपद महिन्याच्या शुक्लपक्षाच्या चतुर्थीला चंद्र दर्शन न करण्याची परंपरा आहे. या दिवशी चंद्राचं दर्शन केल्याने व्यक्तीवर खोटा आरोप लागतो. गणेश चतुर्थीला एखाद्या व्यक्तीने चंद्र पाहिला तर त्याला विनाकारण बदनामी सहन करावी लागते. याच कारणास्तव काही लोक याला कलंक चतुर्थीच्या नावाने ओळखतात. पौराणिक कथांनुसार, द्वापार युगात याच चंद्रदोषामुळे भगवान श्रीकृष्णावर स्यमंतक मणीच्या चोरीचा आरोप लागला होता.

खोट्या दोषांबाबत चंद्राच्या कथा
चंद्र दोषाशी संबंधित दोन कथांचा उल्लेख मिळतो. एक कथेनुसार, जेव्हा गणेश चतुर्थीला गणपतीचा जन्म झाला तेव्हा त्याचं गजानन स्वरुप पाहून चंद्र देवता हसू लागले. आपला अपमान होत असल्यामुळे गणेशाने त्यांना काळं होण्याचा श्राप दिला. जेव्हा चंद्र देवाला आपल्या चुकीची जाणीव झाली त्यानंतर त्यांनी गणेशाकडे क्षमा मागितली आणि यावर उपाय विचारला. त्यावेळी गणपती बाप्पा म्हणाला, जसं जसं तुमच्यावर सूर्यप्रकाश पडेल, तुमच्यातील तेज परत येईल.
दुसऱ्या मान्यतेनुसार, माता पार्वती आणि महादेवाची परिक्रमा केली. यानंतर सर्व देवदेवतांनी गणेशाला नमस्कार केला. मात्र चंद्राला आपल्या सौंदर्याचा अभिमान होतो आणि त्याने गणेशाला नमस्कार करण्यास नकार दिला. त्यावेळी गणेशाने त्यांना रुप काळ होईल असा श्राप दिला. माफी मागितल्यानंतर सूर्यदेवतेचा उपाय सांगितला.
चंद्रदर्शन दोष कसा होईल दूर?
1 जर या दिवशी कोणी व्यक्तीने अनाहूतपणे चंद्राचं दर्शन केलं तर त्यापासून होणाऱ्या दोषापासून बचाव करण्यासाठी गणेशाला नतमस्तक व्हायला हवे. मान्यतेनुसार, स्नान-ध्याय केल्यानंतर गणपतीचं ध्यान किंवा दर्शन करावं आणि १२ नाव घेतल्याने चंद्र दोष दूर होईल.
२ गणेश चतुर्थीला लागणारा चंद्र दोष दूर करण्यासाठी गणेशाला फळ चढवावं आणि ते कोणी गरजू व्यक्तीला दान करावं.
३ गणेश चतुर्थीला लागलेल्या चंद्र दोषाचा दुष्प्रभाव दूर करण्यासाठी “सिंह: प्रसेन मण्वधीत्सिंहो जाम्बवता हत:. सुकुमार मा रोदीस्तव ह्येष: स्यमन्तक:” या मंत्राचा जप करावा.
(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही.)











