Margshirsh Guruwar 2025 : मार्गशीर्ष गुरुवार पूजा करण्याची काय आहे पद्धत? जाणून घ्या महालक्ष्मी व्रताचे महत्त्व

मार्गशीर्ष महिना हा खूप पवित्र महिना मानला जातो. या महिन्यात येणारे चारही गुरुवार विशेष असतात. या दिवशी विधीवत पूजा केल्याने व्यक्तीला जीवनामध्ये फायदा होतो. कलश स्थापना करण्यासाठी वेळ जाणून घ्या...

मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवार हा महालक्ष्मी व्रतासाठी महत्त्वाचा मानला जातो. या महिन्यात गुरुवारी लक्ष्मीची पूजा केल्याने घरात सुख, समृद्धी आणि धन-धान्य नांदते असे म्हणतात. या व्रतासाठी कलश मांडून पूजा करतात. देवी लक्ष्मीची पूजा करून रात्री गोड-धोड नैवेद्य देवीला अर्पण केला जातो. बऱ्याच ठिकाणी या व्रताच्या निमित्ताने स्त्रियांना हळदी कुंकू लावून वाण दिले जाते. या व्रतामुळे ऐश्वर्य, यश आणि धन-संपत्ती प्राप्त होते अशी धार्मिक मान्यता आहे. 

महालक्ष्मी व्रताचे महत्त्व

मार्गशीर्ष महिन्यात महालक्ष्मीची उपासना केल्याने घरात सुख, समृद्धी, शांती आणि धन-धान्याची भरभराट होते. या दिवशी कलश आणि देवीची विधिवत पूजा केली जाते आणि लाह्या-फुटाणे व पुरणपोळीचा नैवेद्य दाखवला जातो. हे व्रत घरात सुख-समृद्धी आणि शांती आणते, असे मानले जाते. मनोभावे पूजा केल्यास देवी प्रसन्न होऊन संपूर्ण कुटुंबावर कृपा करते.

मार्गशीर्ष गुरुवार पूजा करण्याची पद्धत

  • घट ज्या ठिकाणी मांडाल, तिथली जागा स्वच्छ करून रांगोळीने स्वस्तिक काढावा.
  • त्यावर चौरंग किंवा पाट ठेवावा.
  • चौरंगावर लाल कापड ठेवून त्यावर तांदूळ, त्यावर तांब्याचा कलश ठेवावा.
  • कलशाला हळद-कुंकु लावून आत पाणी, अक्षता, दूर्वा, एक नाणं आणि सुपारी घालावी.
  • विड्याची पाने किंवा आंब्याची डहाळी, पंचपात्र कलशावर ठेवावी, त्यावर नारळ ठेवावा.
  • लाल कापडावर थोडे तांदूळ पसरवून त्यावर कलशाची स्थापना करा,
  • आता त्याठिकाणी श्री लक्ष्मीदेवीचा फोटो किंवा लक्ष्मी श्रीयंत्र ठेवावे.
  • कलशापुढे विडा, खोबरे, खारीक, बदाम, इतर फळे, खडीसाखर किंवा गूळ नैवेद्य म्हणून ठेवावा.

(टीप : वरील सर्व बाबी MP मराठी Breaking  केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून MP मराठी Breaking  कोणताही दावा करत नाही.)


About Author

Asavari Khedekar Burumbadkar

Other Latest News