Money related vastu dosh and remedies: पंचतत्वाच्या आधारावरील वास्तू शास्त्रानुसार, घरातील वस्तू योग्य दिशा आणि योग्य ठिकाणी असतील तर व्यक्तीच्या सुख-समृद्धीत वृद्धी होते. मात्र या वस्तू चुकीच्या ठिकाणी असतील तर अडचणींचा सामना करावा लागतो. जर तुम्हाला असं वाटतं की मेहनत आणि प्रयत्नांनी तुम्ही पैसे तर भरपूर कमवता, पण ते टिकत नाही तर तुम्ही या गोष्टींकडे लक्ष द्यायला हवं. घरातील पैशांची तिजोरी नेहमी भरून वाहत असावं अशी इच्छा असेल तर खाली दिलेल्या वास्तू नियमांकडे दुर्लक्ष करू नका.
वास्तू नियमांकडे दुर्लक्ष करू नका
१ घर नेहमी स्वच्छ ठेवा

पैसे टिकत नाहीत असं जर तुम्हाला वाटत असेल तर आधी तुम्हाला घर स्वच्छ ठेवायला हवं. कारण लक्ष्मी देवी अस्वस्थ ठिकाणी थांबत नाही.
२ इथं कधीच पैसे ठेवू नका
वास्तूशास्त्रानुसार, घरात शिड्यांच्या खाली किंवा टॉयलेय आणि आग्नेय कोपऱ्यात, स्वंयपाकघराजवळ कधीही पैसे ठेवायचा जागा बनवू नये. आग्नेय कोपऱ्यात ठेवलेल पैसे रोग किंवा अशा संबंधित गोष्टीत खर्च होतात. आणि व्यक्तीला पैशांच्या अडचणीचा सामना करावा लागतो.
३ दक्षिणेला पैसे ठेवायची जागा किंवा तिजोरी नसावी
वास्तूशास्त्रानुसार, कधीही दक्षिण दिशेला पैसे ठेवायची जागा किंवा तिजोरी बनवू नये. ही दिशा यमाची दिशा मानली जाते. पैसे ठेवायची जागा नेहमी उत्तरेला बनवावी कारण ही कुबेराची दिशा आहे.
४ पैसे ठेवायची जागा कशी असावी
वास्तूशास्त्रानुसार, पैशांची जागा ठेवण्याबाबत काही नियम करण्यात आले आहेत. पैसे ठेवायची जागा नेहमी स्वच्छ असावी. येथे कधीही जाळं किंवा अस्वच्छता नसवी. पैसे ठेवायच्या जागेवर कधीही जुनी बिलं किंवा अन्य गोष्टी ठेवू नये. यामुळे मोठा वास्तूदोष होतो.
५ तर लक्ष्मी नाराज होते
वास्तूशास्त्रानुसार, तुमची पैसे ठेवायची जागा असो किंवा तुमची पर्स त्याला कधीच खरकटे हात किंवा अपवित्र अवस्थेत स्पर्श करू नये. अन्यथा लक्षी नाराज होते. याशिवाय तिजोजीत कधीही फाटलेले नोट किंवा खोटी नाणी ठेवू नये.
६ तातडीने गळणारा नळ व्यवस्थित करा
सनातन परंपरेत पाणी हे लक्ष्मीचं प्रतिक आहे. ज्या घरात नळ गळत असेल किंवा पाणी वाया जात असेल तेथे देवी लक्ष्मी कधीही वास करीत नाही. पाण्याच्या गळतीमुळे निर्माण होणारे वास्तू दोष व्यक्तीला तेच पैसे इतर ठिकाणी खर्च करायला लावतात.
७ मुख्य दरवाज्याचा वास्तूदोष
वास्तूशास्त्रानुसार, घराच्या मुख्य गेट आणि तुमच्या पैशांचा खोल संबंध असतो. कारण याच मार्गाने देवी तुमच्या घरात प्रवेश करते. त्यामुळे घराचं मुख्य द्वार नेहमी मंगल प्रतीकांनी सजवायला हवं. ज्या घराचं मुख्य द्वार तुटलेलं असतं त्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतो.
८ घरात झाडू कुठे ठेवाल
हिंदू धर्मशास्त्रानुसार, झाडू किंवा केरसुणी माता लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं. झाडू पायाखाली येईल अशा ठिकाणी ठेवू नय. झाडू कधीही तिजोरी जवळ किंवा किचनमध्ये ठेवू नये. झाडू मोकळ्या जागा ठेवण्याऐवजी पश्चिमेकडे कोणाचं लक्ष जाणार नाही अशा ठिकाणी ठेवा.
९ घरात खराब किंवा बंद घड्याळ ठेवू नये
वास्तूशास्त्रानुसार, घरात कधीही बंद घड्यात ठेवू नये. वास्तूनुसार, बंद किंवा खराब घड्याळ नकारात्मक ऊर्जेचं कारण ठरू शकतं. यामुळे तुमच्या प्रगतीत अडसर होऊ शकतो.
१० ईशान्येकडील कोपरा नेहमी मोकळा आणि स्वच्छ ठेवा
वास्तुशास्त्रानुसार, ज्या लोकांच्या घरात ईशान्य कोपरा जास्त असतो त्यांच्या घरात पैशाचा प्रवाह मंदावतो. अशा घरांमध्ये पैशांशी संबंधित समस्या अनेकदा दिसून येतात. ईशान्य कोपरा नेहमी स्वच्छ आणि खुला ठेवा.
(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही.)











