काही दिवसांपूर्वी 9 सप्टेंबर रोजी सोलापुरातल्या बार्शी तालुक्यातील सासुर या गावात एका कारमध्ये माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांचा मृतदेह आढळून आला. त्यांनी पूजा गायकवाड या नर्तिकेच्या प्रेमाच्या नादात हे पाऊल उचलले होते. आता खरंतर या प्रकरणात सातत्याने नवनवे खुलासे होताना दिसत आहेत. गोविंद बर्गे यांनी वैराग इथं येऊन पूजा गायकवाडच्या घरासमोर एका कारमध्ये डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केली होती. या प्रकरणी पारगाव येथील कला केंद्रातील नर्तिक पूजा गायकवाडला पोलिसांनी अटक केली आहे. पूजाची सखोल चौकशी सुरू असून या प्रकरणात आता सातत्याने धक्कादायक आणि नवनवे खुलासे होताना दिसत आहेत.
‘ते’ पिस्तूल गोविंद बर्गेंचं नाही, पोलिसांचा दावा
पोलिसांनी गोविंद बर्गे यांनी आत्महत्या केली त्यावेळी वापरलेल्या पिस्तुलीबद्दल नवीन दावा केला आहे. गोविंद बर्गे यांनी गोळी झाडून ज्या पिस्तुलीनं आत्महत्या केली, ते पिस्तूल गोविंद बर्गेंचं नसल्याचं आलं समोर आहे. गोविंद बर्गे यांच्या नावावर कोणत्याही प्रकारचे पिस्तूल नसल्याचं तपासात उघड झालं आहे. सदर पिस्तूल हे बर्गे यांनी दुसऱ्याकडून खरेदी केलं असावं असा दावा पोलिसांनी केला आहे. या पिस्तुलीचा त्याचा पत्रव्यवहार संबंधित विभागाकडे सुरू आहे.

पूजा गायकवाडचं ब्लॅकमेलिंग आणि आत्महत्या
कोठडी संपल्यानंतर पूजाला आज शनिवारी बार्शी न्यायालयात हजर करण्यात आलं होतं. ज्या दिवशी बर्गेंनी आत्महत्या केली, त्या दिवशी गोविंद बर्गे आणि पूजा गायकवाड यांच्यामध्ये फोनवर काय संवाद झाला हे तपासायचं आहे. यासाठी पूजा गायकवाडच्या फोनचा सीडीआर काढणे गरजेचं आहे आणि त्याचं विश्लेषण करणं आहे. असे पोलिसांचे मत आहे.
पूजाने कुणाला किती लुबाडलं? तपास सुरू
कला केंद्रात काम करणारी पूजा गायकवाड हिने गोविंद बर्गे यांच्यासारख्या किती जणांना फसवलं आहे, याचा तपास करायचा आहे. त्यामुळे तिची कोणत्या बँकेत खाती आहे, बँक स्टेटमेंटवरून आर्थिक व्यवहारांची तपासणी पोलीस करणार आहे. पूजा गायकवाड हिने अजून गोविंद बर्गे सारखं कुणाला फसवलं आहे का याचाही तपास पोलीस करत आहेत. पोलिसांनी पूजा गायकवाडने अजून एक खरेदी-विक्रीचा दस्त सांगितला आहे, तो मिळवण्यासाठी पोलीस कोठडी मिळावी. ज्या दिवशी गोविंद बर्गे यांनी आत्महत्या केली. त्या दिवशी बर्गे यांनी पूजाला फोन केले होते. त्या दोघांचे कॉल डिटेल्स आणि चॅटिंग यातून काय काय तपास होऊ शकतो, या संदर्भात युक्तिवाद करण्यात आला होता. पूजा गायकवाड आणि इतर जे बँक खाते आहे, त्याच्या तपासणीसाठी यातून आर्थिक व्यवहार उघड होतील, असं सांगितलं जात आहे.
नेमकी काय घटना घडली?
गोविंद बर्गे लुखामसाला गावचे माजी उपसरपंच होते. लुखामसला येथे त्यांचा प्लॉटिंगचा व्यवसाय होता. ते पूजा गायकवाड या नर्तिकेच्या प्रेमात वेडे झाले होते. पूजा गायकवाड गेल्या काही दिवसांपासून त्यांच्याशी बोलत नव्हती. सोमवारी रात्री ते पूजाच्या घरी गेले होते. मात्र, त्याठिकाणी काही वाद झाल्याने गोविंद बर्गे यांनी याच नर्तिकेच्या घरासमोर कारमध्ये स्वत:च्या कानशिलात गोळी झाडून आत्महत्या केली, अशी माहिती समोर येत आहे, पोलिसांनी तातडीने घटनास्थळाचा पंचनामा केला. सकृतदर्शनी हे प्रकरण आत्महत्येचे वाटत असले तरी पोलीस गोविंद बर्गे यांच्यासोबत घातपात झाला का, ही शक्यताही पडताळून पाहत आहेत. गोविंद बर्गे यांच्या पश्चात पत्नी, मुलगी आणि मुलगा असा परिवार आहे.











