Sonakshi Sinha : सोनाक्षीने पती झहीरसोबत मशिदीतून शेअर केले फोटो, ट्रोलर्सना म्हणाली, “नीट बघं आम्ही…

करवा चौथच्या दिवशी सोनाक्षीने तिच्या पती झहीर इकबालसोबत अबू धाबीच्या प्रसिद्ध शेख जायेद ग्रँड मशिदीतून काही खास फोटो आणि व्हिडीओ तिच्या इन्स्टाग्राम हँडलवर शेअर केले

बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा (Sonakshi Sinha)सध्या तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे सोशल मीडियावर चर्चेत आली आहे. करवा चौथच्या दिवशी सोनाक्षीने तिच्या पती झहीर इकबालसोबत अबू धाबीच्या प्रसिद्ध शेख जायेद ग्रँड मशिदीतून काही खास फोटो आणि व्हिडीओ तिच्या इन्स्टाग्राम हँडलवर शेअर केले. या पोस्टनंतर ती मोठ्या प्रमाणावर ट्रेंड होऊ लागली. तुम्ही पाहू शकता कि, फोटोमध्ये सोनाक्षी पारंपरिक सलवार सूटमध्ये असून, डोक्यावर ओढणी घेतलेली दिसते. तिचा हा पारंपरिक लूक चाहत्यांच्या विशेष पसंतीस उतरला आहे. झहीरसोबत ती मशिदीच्या परिसरात फिरताना दिसतेय. यावेळी त्यांनी मशिदीच्या सौंदर्याचा अनुभव घेतला आणि शांत वातावरणात काही निवांत क्षण घालवले.

काय आहे सोनाक्षीची पोस्ट ? Sonakshi Sinha

या पोस्टसोबत सोनाक्षीने “अबू धाबीमध्ये एक छोटंसं समाधान मिळालं” असं कॅप्शन लिहिलं, ज्यातून ती त्या क्षणांचा आनंद व्यक्त करताना दिसली. मात्र काही युजर्सनी या फोटोवर टीका करत प्रश्न उपस्थित केला की, “बूट घालून मशिदीत प्रवेश करणं चुकीचं आहे, तुम्ही तसेच गेलात का?” यावर सोनाक्षीने संयम राखत, पण ठामपणे उत्तर दिलं की, “बूट घालून आम्ही आत गेलो नाही, नीट बघं. मशिदीच्या बाहेर आहोत आम्ही. आत जाण्याआधी बूट बाहेर काढले. एवढं तर आम्हाला येतं.” तिच्या या प्रत्युत्तरानंतर ट्रोलर्सची बोलती बंद झाली असून, तिच्या चाहत्यांनी तिच्या स्पष्टवक्तेपणाचं कौतुक केलं आहे. Sonakshi Sinha

सोनाक्षीचं लग्न ठरलं होतं चर्चेचा विषय ?

सोनाक्षी (Sonakshi Sinha) आणि झहीरचं नातं अलिकडच्या काळात बॉलिवूडमधील चर्चेचा विषय ठरत आहे. दोघांनी धार्मिक भिन्नता असूनही परस्पर सन्मान, समजूतदारपणा आणि प्रेमावर आधारित नातं निर्माण केलं आहे. करवा चौथसारख्या हिंदू सणानिमित्त मुस्लिम देशात मशिदीच्या परिसरात एकत्र वेळ घालवणं हे त्यांचं नातं केवळ वैयक्तिक नाही तर सामाजिक समजुतीचंही उदाहरण बनलं आहे. या फोटो आणि व्हिडीओवर सोशल मीडियावर भरभरून प्रतिसाद मिळत असून, अनेकांनी त्यांच्या कपल गोल्सचं कौतुक केलं आहे. अनेक युजर्सनी सोनाक्षीच्या पारंपरिक लूकचं, तर काहींनी तिच्या उत्तराचं अभिनंदन केलं आहे.


About Author

Asavari Khedekar Burumbadkar

Other Latest News