30 Day Dahi Challenge: दही सर्वच घरांमध्ये असतं. लोक जेवणाची चव अधिक वाढविण्यासाठी दही खाणं पसंत करतात. चवीबरोबरच दही आरोग्यासाठी फायदेशीर असतं. त्यामुळे आहारतज्ज्ञ दही सुपरफूड असल्याचं मानतात. प्रसिद्ध आहारतज्ज्ञ लीमा महाजन यांनी आपल्या इन्टाग्राम अकाऊंटवरुन एक व्हिडिओ शेअर केला. या व्हिडिओमध्ये आहारतज्ज्ञांनी ३० दिवस दररोज दही खाण्याचा सल्ला दिला. दररोज दही खाल्ल्याने शरीरावर काय परिणाम होतो?
30 दिवस सलग दही खाल्ल्याने काय होईल?
त्वचा चमकदार होईल

आहारतज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, दह्यातील लॅक्टिक अॅसिड शरीरातून टॉक्सिन बाहेर काढतं. यामुळे त्वचा आतून स्वच्छ होते, चेहऱ्यावरील काळपटपणा कमी होतो. सोबतच यातील बायोटीन नवी सेल्स बनवायला मदत करतं. ज्यामुळे त्वचेवर नैसर्गिक चमक येते
केस मजबूत आणि चमकदार होतील
आहारतज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, दह्यात सहा ग्रॅम प्रोटीन असतं. यातील बायोटिन मिळून केरॉटिन प्रोडक्शन वाढतं. हे केरॉटिन तुमचे केस मजबूत करतात आणि त्यांना नैसर्गिक चमक येते.
उत्साह वाढतो
दह्यात मोठ्या प्रमाणात विटॅमिन बी१२ असतं. हे विटॅमिन लाल रक्तपेशी वाढविण्यास मदत करतात. ज्यामुळे शरीराला ऑक्सिजनचा पुरवठा वाढतो. ज्याचा परिणाम थेट एनर्जीवर पडतो. थकवा कमी होतो आणि दिवसभरत अॅक्टिव्ह राहता.
हाडं आणि सांध्यांना मिळेल फायदा
दह्यात कॅल्शिअम आणि फॉस्फरस मुबलक प्रमाणात असतं. एक वाटी दह्यात साधारण १८० mg कॅल्शिअम आणि १४० mg फॉस्फरस असतं. हे दोन्ही मिनरल्स मिळून तुमची हाडं मजबूत करतात. सांध्यांचं आरोग्य सुधारतात आणि ऑस्टियॉपोरॉसिसचा धोका कमी करतात.
पचन यंत्रणा हेल्दी राहील
दह्यातील प्रोबायोटिक्स म्हणजेच गुड बॅक्टेरिया आतड्यांच्या आरोग्यसाठी आवश्यक आहे. यामुळे पचन यंत्रणा सुधारते. ब्लोटिंग, अॅसिडिटी आणि बद्धकोष्ठतासारख्या आजारांना दूर ठेवतात.
View this post on Instagram
दररोज एक वाटी दही खाल्ल्याने तुमच्या आरोग्याला अगणित फायदे मिळू शकतात.
(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही.)











