list of Fruits That Should Not Be Refrigerated : अनेकांना वाटतं फळं फ्रिजमध्ये ठेवल्याने ते जास्त काळ सुरक्षित राहतात. मात्र तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रत्येक फळ फ्रिजमध्ये ठेवणं योग्य नाही. काही फळं फ्रिजमध्ये ठेवल्याने त्याची पौष्टिकता कमी होते आणि चव बिघडते. इतकच नाही तर अनेकदा ही फळं लवकर खराब होऊन आरोग्याला नुकसान पोहोचवू शकतात.
केळं फ्रीजमध्ये ठेवू नये । banana fridge side effects
– केळ कधीच फ्रीजमध्ये ठेवू नये
– फ्रीजमध्ये ठेवल्याने केळ्याचा रंग काळा पडतो
– यातील अॅथलीन गॅस जवळ ठेवलेल्या फळांना पिकवण्याचं काम करतं.
– त्यामुळे केळं नेहमी खोलीतील तापमानावर स्टोअर करावं.

अवाकाडो खोलीच्या तापमानात ठेवा । fruits should be avoided to keep in freeze
– कच्च अवाकाडो फ्रीजमध्ये ठेवल्याने लवकर खराब होतं
– फ्रीजमध्ये ठेवल्याने अवाकाडोची पिकण्याची क्रिया थांबते
– अवाकाडो खोलीच्या तापमानात ठेवल्याने नैसर्गिकरित्या पिकतो.
खरबूज कापेपर्यंत बाहेर ठेवा । fruits should be avoided to keep in freeze
– खरबूज तुम्ही कापत नाही तोपर्यंत खोलीच्या तापमानात ठेवायला हवं.
– बाहेर ठेवल्याने यात गोडवा आणि चव द्विगुणीत होते.
– कापल्यानंतर हे फळ फ्रीजमध्ये ठेवणं सुरक्षित आहे.
सफरचंद फ्रीजमध्ये फार वेळ ठेवू नये । apple in fridge harmful
सफरचंद
– सफरचंदातील नैसर्गिक एन्जाइम त्याला पिकवण्याचं काम करतं
– बराच काळ फ्रीजमध्ये ठेवल्याने सफरचंद जास्त पिकतं
– यामुळे याची चव आणि टेक्सचर दोन्ही बिघडतं.
आंबा आणि लिची फ्रिजपासून दूर ठेवा
– आंब्यातील अँटीऑक्सिडेंट फ्रिजमध्ये ठेवल्याने कमी होतात. यामुळे पोषण तत्व कमी होतं.
– लिच – हे नाजूक आणि रसयुक्त फळ आहे. फ्रिजमध्ये ठेवल्याने हे फळ आतून लवकर खराब होऊ लागतं आणि याची चव बिघडते. प्रत्येक फळ फ्रिजमध्ये ठेवण्याची गरज नसते. केळ, आंबा, लिची, अवाकाडो, खरबूज, सफरचंदासारखे फळ खोलीच्या तापमानात ठेवल्याने अधिक हेल्दी आणि चवदार लागतात. योग्य पद्धतीने फळ स्टोअर केल्याने त्याची पौष्टिकता कायम राहते आणि आरोग्यावर सकारात्मक परिणाम होतो.
(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही.)











