कांदा आपल्या आहाराचा महत्त्वपूर्ण भाग आहे. अनेकदा जेवताना कच्चा कांदा तोंडी लावायला आवडतो. त्यातही मांसाहारी जेवण असेल तर कच्चा कांदा ताटात घेतल्याशिवाय जेवण अपूर्ण असतं. मात्र चव वाढवणारा हा कांदा आपल्याला आजारीही करू शकतो. त्यामुळे कच्चा कांदा खाल्ल्याने काय नुकसान होऊ शकतं, याबाबत आज आपण जाणून घेणार आहोत.
पोट आणि पचनक्रियेवर परिणाम
कच्चा कांदा खाल्ल्याने गॅस आणि अपचनची समस्या होऊ शकतो. यामध्ये फायबर असतं, मात्र कोणासाठी यामुळे पोट भारी आणि अस्वस्थ वाटू शकतं. जर तुम्हाला आधीच पोटासंबंधित त्रास (गॅस्ट्रित किंवा अॅसिडिटी) असेल तर कच्चा कांदा त्रास वाढवू शकतो.

त्वचा विकार आणि अॅलर्जी
काहींना कांद्यामुळे अॅलर्जी होऊ शकते. यामुळे त्वचेवर रॅशेज, खाज आणि सूज येऊ शकते. जर कच्चा कांदा खाल्ल्यानंतर तुम्हाला शरीरावर काही परिणाम दिसून आला तर तातडीने डॉक्टरांशी संपर्क करा. वेळीच याकडे लक्ष दिलं नाही तर भविष्यात त्रास वाढू शकतो.
तोंडाला दुर्गंधी येणे
कच्चा कांदा खाल्ल्याने तोंडाला दु्र्गंधी येते. त्यात असलेले सल्फर कंपाऊंड्समुळे तोंडाला दुर्गंधी येते. जर तुम्ही ऑफिसमध्ये किंवा मित्रांसोबत असाल तर यामुळे थोडीशी लाजिरवाणी परिस्थिती निर्माण होऊ शकते.
रक्तातील साखरेवर परिणाम
कच्चा कांदा खाल्ल्याने रक्तातील साखर कमी-जास्त होऊ शकते. मधुमेहींनी या गोष्टीकडे लक्ष द्यायला हवं. आणि डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कांदा खाऊ नये.
हृदय आणि रक्तदाब
कांद्यात अँटऑक्सिडेंट असतात. जे हेल्दी असतात मात्र अतिरिक्त कच्चा कांदा खाल्ल्याने काही लोकांमध्ये रक्तदाब किंवा हृदयाच्या ठोक्यांवर परिणाम करू शकतात.
जर तुम्हाला कांदा खायचा असेल तर भाजलेला किंवा हलका शिजलेला कांदा सुरक्षित आहे. कच्चा कांदा खायचाच असेल तर कमी प्रमाणात खा.
(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही.)











