Real Or Fake Paneer: बनावट पनीर कसं ओळखाल? घरच्या घरी, झटपट तपासून पाहा…

अनेक ठिकाणी बनावटी पनीर युरीया, शँम्पू आणि स्टार्चसारख्या धोकादायक गोष्टींपासून तयार केलं जात आहे.

How to identify fake paneer: पनीर भारतीय स्वयंपाकघरातील एक महत्त्वाचा भाग आहे. विशेषत: शाकाहारींसाठी प्रोटीन आणि कॅल्शिअमसाठी पनीर हा चांगला स्त्रोत मानला जातो. मात्र सध्या बाजारात विकलं जाणारं पनीर आरोग्यासाठी फायदेशीर ठरण्याऐवजी त्रासदायक ठरत आहे. अनेक ठिकाणांहून यासंदर्भातील अहवाल समोर आला आहे. अनेक ठिकाणी बनावट पनीर युरीया, शँम्पू आणि स्टार्चसारख्या धोकादायक गोष्टींपासून तयार केलं जात आहे.

बनावट पनीर खाण्याचे नुकसान । Fake paneer side effects

बनावट पनीरचं सेवन केवळ पोटाच्या आजाराशी संबंधित नाही, तर भविष्यात गंभीर आजारांसाठी कारणीभूत ठरू शकतं.
– युरीयामिश्रित पनीर कॉलेस्ट्रेरॉल वाढवून हृदयाचं आरोग्य धोक्यात घालतं.
– आतड्यांचं आरोग्य बिघडल्याने बँक्टेरिया असंतुलित होतं.
– बराच काळ बनावटी पनीर खाल्ल्याने ठिसूळ हाडं, लिव्हर आणि किडनी डॅमेज होऊ शकतं.
– काही संशोधनानुसार, यामुळे कॅन्सरचा धोका वाढू शकतो.
– सर्वाधिक फूड पॉइजनिंग आणि पचनासंबंधित त्रास उद्भवतो.

शुद्ध किंवा चांगल्या दर्ज्याचं आणि बनावट पनीर कसं ओळखाल? l Real or Fake Paneer test

आयोडिन टेस्ट – पनीर दोन मिनिटभर पाण्यात उकळवा आणि त्यावर आयोडिनचे दोन थेंब टाकावेत. जर पनीरचा रंग काळा झाला असेल याचा अर्थ हे पनीर बनावट आहे.

तुरीच्या डाळीची टेस्ट – पनीरवर तुरीच्या डाळीची पेस्ट टाका. जर रंग गडद पिवळा झाला याचा अर्थ त्यात युरिया आहे.

वास आणि टेक्सचर टेस्ट – चांगल्या दर्ज्याच्या पनीरला सौम्य आंबट आणि दुधाळ वास असतो, तर बनावट पनीरचा वास अधिक तीव्र आणि कृत्रिम असतो. त्याची पोत देखील कठीण आणि रबरी असते.

घरातच बनवा शुद्ध आणि हेल्दी पनीर

फूल फॅट दूध उकळवा आणि त्यात लिंबू पिळा. यानंतर दूध फाटेल. थोडा वेळ दूध तसंच उकळलवन घ्या. यानंतर एखाद्या मलमलच्या कपड्यातून हे पाणी गाळून घ्या. यानंतर या कापडावर जड वस्तू ठेऊ स्वयंपाकघराच्या एखाद्या कोपऱ्यात ठेवा. यामुळे अतिरिक्त पाणी निघून जाईल. घरच्या घरीत ताजं पनीर खाता येईल. बाजारात विकलं जाणारं बनावटी पनीर आरोग्यासाठी धोकादायक असंत. अशावेळी तुम्ही घरच्या घरी चांगलं पनीर तयार करू शकता.

(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही.)


About Author

Smita Gangurde

Other Latest News