किडनी आपल्या शरीरातील महत्त्वपूर्ण भाग आहे. किडनी रक्त फिल्टर करणे, टॉक्सिन्स बाहेर काढणे आणि शरीरातील मिनरल्स संतुलित ठेवण्याच काम करते. मात्र सद्यपरिस्थिती चुकीची लाइफस्टाइल आणि चुकीच्या खाण्याच्या पद्दती आणि औषधांचं वाढलेलं सेवन यामुळे किडनीवर परिणाम होत आहे. सर्वात मोठी बाब म्हणजे लोक याच्या सुरुवातीची लक्षणं ओळखू शकत नाही आणि कळेपर्यंत आजार धोकादायक स्तरापर्यंत जाऊन पोहोचतो.
सकाळी उठताच दिसणाऱ्या किडनी डॅमेजचे ५ संकेत
चेहरा आणि डोळ्यांना सूज

सकाळी उठताच तुमचा चेहरा, विशेषत: डोळ्यांखाली सूज राहत असेल तर हे किडनी डॅमेजचं सुरुवातीचं लक्षण आहे. किडनी जेव्हा योग्य पद्धतीने काम करीत नाही, तेव्हा शरीरात अतिरिक्त फ्लूइ़ड जमा होऊ लागतं.
सकाळी थकवा येणं
चांगली झोप झाल्यानंतरही सकाळी उठल्याबरोबर तुम्हाला खूप थकवा आणि अशक्तपणा जाणवत असेल, तर याकडे दुर्लक्ष करू नका. जेव्हा किडनी खराब होते तेव्हा शरीरात विषारी पदार्थांचे प्रमाण वाढते, ज्यामुळे थकवा आणि अशक्तपणा वाढतो.
युरिनमध्ये फेस येणे
सकाळी उठल्यावर होणाऱ्या पहिल्या लघवीत जर फेस दिसत असेल तर हे प्रोटीन लिकेजचे संकेत आहेत. सर्वसाधारणपणे युरिनमधून येणारा फेस लवकर गायब होतो, मात्र जर हा फेस बराच वेळ राहत असेल तर किडनीच्या आरोग्यासाठी हा अलर्ट आहे.
पायाला सूज येणे
सकाळी उठताच पाय आणि घोट्यांमध्ये सूज येणे हे देखील किडनी डॅमेज होण्याचं लक्षण आहे. याचे कारण म्हणजे किडनी शरीरातून सोडियम आणि द्रव काढून टाकू शकत नाहीत, ज्यामुळे पायाच्या खालच्या भागात सूज येते.
सकाळी डोकेदुखी
किडनी डॅमेजचमुळे शरीरात टॉक्सिन्स जमा होतात, ज्यामुळे मेंदूपर्यंत रक्तप्रवाह नीट होऊ शकत नाही. परिणामी सकाळी उठताच डोकेदुखी, चिडचिड आणि लक्ष केंद्रीत करायला त्रास होतो.
डॉक्टरांनी संपर्क कधी कराल
ही लक्षणं सलग एक ते दोन आठवडे दिसत असतील तर डॉक्टरांकडून तपासून घ्या. ब्लड टेस्ट आणि युरिन टेस्टमधून किडनीमध्ये होणाऱ्या बिघाडाची माहिती मिळू शकेल.
बचावासाठी काय कराल?
– जास्त पाणी प्या आणि हायड्रेटेड राहा
– ज्यास्त मीठ आणि पॅकेज फूड टाळा
– रक्तातील साखर आणि रक्तदाब नियंत्रणात ठेवा
– अतिरिक्त पेनकिलर किंवा अँटिबायोटिकचा वापर नको
– नियमित हेल्थ चेकअप करून घ्या.
(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही.)











