What Food Helps Burn Tummy Fat : वजन कमी करण्यासाठी काय खाल? स्वयंपाकघरातील या ४ पदार्थांना बनवा आपला सोबती

काही पदार्थ अशी असतात जी मेटाबॉलिज्म वाढवतात आणि भूक नियंत्रणात ठेवतात. याशिवाय फॅट बर्न करायला मदत करतात. अशा चार पदार्थांविषयी समजून घेऊया.

What Food Helps Burn Tummy Fat: चुकीची खाद्यपद्धती आणि बदलत्या जीवनशैलीमुळे स्थूलत्व ही सर्वसाधारण समस्या झाली आहे. अशावेळी वजन कमी करण्यासाठी आहरात बदल करण्याची गरज असते. आता प्रश्न उपस्थित होतो तो वजन कमी करण्यासाठी काय खाल, काही पदार्थ अशी असतात जी मेटाबॉलिज्म वाढवतात आणि भूक नियंत्रणात ठेवतात. याशिवाय फॅट बर्न करायला मदत करतात. अशा चार पदार्थांविषयी समजून घेऊया.

जलद गतीने वजन कमी करायला काय खाल?

हिरव्या भाज्या –

हिरव्या भाज्या, ज्यामध्ये पालक, ब्रोकोली आणि गाजर यांसारख्या अनेक भाज्यांचा समावेश होतो. या भाज्यांमध्ये फायबर भरपूर आणि कॅलरी कम असते. त्यामुळे याचं सेवन वजन कमी करायला मदत करतं.

ताक –

ताक एक कमी कॅलरीज असलेलं पेयं आहे. यामुळे पचनक्रिया सुधारते आणि भूक कमी लागते. वजन कमी करायला ताकाची मदत होते.

चिया सीड्स

चिया सीड्समध्ये ओमेगा-३ फॅटी अॅसिड भरपूर प्रमाणात आहेत. यामुळे मेटॉबॉलिज्म चांगली व्हायला मदत होते. ज्यामुळे वजन कमी करू शकतो.

फळं –

सफरचंद, संत्र, पपई यांसारख्या फळांमध्ये फायबर आणि विटॅमिन भरपूर असतं आणि कॅलरी कमी असते. याचं सेवन वजन कमी करायला मदत करते.

(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही.)


About Author

Smita Gangurde

Other Latest News