BMC Election: मुंबई महापालिकेची प्रभाग आरक्षण सोडतीची तारीख ठरली; इच्छुक उमेदवारांची उत्सुकता शिगेला !

बृहन्मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025 साठी आरक्षण निश्चित करण्यासाठी सोडतीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.

मुंबई महापालिका निवडणूक ही देशातील सर्वात महत्वाच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपैकी एक मानली जाते. मुंबई हे आर्थिक राजधानीचे शहर असल्याने येथे घेतले जाणारे निर्णय संपूर्ण राज्यावर आणि काही प्रमाणात देशावरही प्रभाव टाकतात. महापालिकेमार्फत शहरातील रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता, आरोग्य, शिक्षण आणि पायाभूत सुविधा यासारख्या मूलभूत सेवांचा कारभार चालवला जातो. त्यामुळे योग्य आणि कार्यक्षम प्रतिनिधींची निवड होणे अत्यंत गरजेचे आहे. अशा परिस्थितीत महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने आणखी एक महत्वाचे पाऊल लवकरच उचलले जाणार आहे. कारण लवकरच प्रभागनिहाय आरक्षण सोडत निघणार आहे.

आरक्षण सोडतीची तारीख ठरली !

बृहन्मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025 साठी आरक्षण निश्चित करण्यासाठी सोडतीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. या कार्यक्रमानुसार, 11 नोव्हेंबर 2025 रोजी आरक्षण सोडत काढण्यात येईल. तर, 14 नोव्हेंबर 2025 रोजी आरक्षणाचे प्रारुप प्रसिद्ध झाल्यानंतर 14 ते 20 नोव्हेंबर 2025 या कालावधीत हरकती आणि सूचना सादर करता येतील. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या 2025 मध्ये होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी अनुसूचित जाती (महिला), अनुसूचित जमाती (महिला), नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग, नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग (महिला) व सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षण निश्चिती करण्यासाठी सोडत काढण्यात येणार आहे.

मंगळवार, 11 नोव्हेंबर 2025 रोजी सकाळी 11 वाजता ‘बालगंधर्व रंगमंदिर, तळमजला, सभागृह, नॅशनल महाविद्यालयासमोर, वांद्रे (पश्चिम), मुंबई’ येथे ही सोडत आयोजित करण्यात आली आहे. त्यानंतर, शुक्रवार, 14 नोव्हेंबर 2025 रोजी आरक्षणाचे प्रारुप प्रसिद्ध करण्यात येईल. तर, शुक्रवार, 14 नोव्हेंबर ते गुरुवार, 20 नोव्हेंबर 2025 रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत आरक्षण प्रारुपावर हरकती व सूचना सादर करता येतील. दाखल झालेल्या हरकती व सूचना विचारात घेऊन आरक्षणाची अंतिम अधिसूचना प्रसिद्ध करण्यात येईल.

मुंबईत इच्छुकांचा जीव टांगणीला !

अशा परिस्थितीत महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने अनेक महत्वपूर्ण अशा हालचाली घडताना दिसत आहेत. इच्छुकांचा जीव देखील चांगलाच टांगणीला लागला आहे. दरम्यान, सदर आरक्षणाच्या अनुषंगाने, हरकती व सूचना दाखल करण्यासाठी निवडणूक प्रभागाशी संबंधित कार्यालयाचा पत्ता आणि इतर तपशील बृहन्मुंबई महागरपालिका वेबसाईटवरील https://www.mcgm.gov.in/irj/portal/anonymous/qlBMCGE2025 या लिंकवर उपलब्ध आहे. त्यामुळे सध्या बीएमसीची निवडणूक घोषित होण्याआधीच रण तापताना दिसत आहे.


About Author

Rohit Shinde

Other Latest News