नवी मुंबईत सिडकोचे रेडी-टू-मुव्ह फ्लॅट खरेदी करण्याची सुवर्णसंधी; प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य !

शहर आणि औद्योगिक विकास महामंडळ लिमिटेड (सिडको) ने आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक (EWS) आणि कमी उत्पन्न गटातील (LIG) खरेदीदारांसाठी एक विशेष गृहनिर्माण योजना सुरू केली आहे.

नवी मुंबईत घर खरेदी करण्याचे स्वप्न अनेक सर्वसामान्यांसाठी अजूनही दूर आहे. वाढती घरांची किंमत आणि मर्यादित उत्पन्न यामुळे अनेक कुटुंबांना स्वतःचे घर घेणे कठीण जाते. मात्र, सिडकोकडून कमी उत्पन्न गटातील नागरिकांसाठी उपलब्ध करून दिलेली घरे ही एक मोठी संधी ठरत आहे. परवडणाऱ्या दरात, आवश्यक सुविधा, चांगली सोसायटी आणि सुरक्षित परिसरामुळे ही घरे नागरिकांच्या पसंतीस उतरतात. अशा परिस्थितीत आर्थिक दृष्ट्या दुर्बल आणि कमी उत्पन्न गटातील नागरिकांसाठी सिडकोने एक भन्नाट योजना आणली आहे.

EWS आणि LIG गटातील ग्राहकांना संधी

नवी मुंबईत घर खरेदी करण्याचे स्वप्न पाहणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. पहिल्यांदाच, महाराष्ट्र शहर आणि औद्योगिक विकास महामंडळ लिमिटेड (सिडको) ने आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक (EWS) आणि कमी उत्पन्न गटातील (LIG) खरेदीदारांसाठी एक विशेष गृहनिर्माण योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत, 4,508 तयार घरे प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या तत्त्वावर विकली जातील. कोणतीही लॉटरी होणार नाही. खरेदीदारांना त्यांच्या पसंतीचा फ्लॅट निवडण्याचे पूर्ण स्वातंत्र्य असेल.

सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे प्रधानमंत्री आवास योजने (PMAY) अंतर्गत EWS श्रेणीतील खरेदीदारांना 2.50 लाख रुपयांच्या अनुदानाचा लाभ मिळणार आहे. हे फ्लॅट नवी मुंबईतील तळोजा, द्रोणागिरी, घणसोली, खारघर आणि कळंबोली यासारख्या प्रमुख भागात आहेत.  थेट महामार्ग, विमानतळ आणि मेट्रो स्टेशनशी जोडलेले आहेत. या योजनेसाठी ऑनलाइन नोंदणी 22 नोव्हेंबर 2025 पासून सुरू झाली आणि 21 डिसेंबरपर्यंत सुरू राहील.

प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य; संधी साधा

सिडकोने जाहीर केलेली योजना ही EWS आणि LIG गटासाठी आहे. ज्यांचे उत्पन्न सहा लाखांपर्यंत आहे त्यांना EWS च्या घरांसाठी अर्ज करता येणार आहे. ज्यांचे उत्पन्न हे 6 लाखांपेक्षा जास्त आहे त्यांना LIG त्या घरांसाठी अर्ज करता येईल. ही घरं तळोजा, द्रोणागिरी, खारघर,घणसोली आणि कळंबोली भागात आहेत. यातील सर्वात स्वस्त घर हे EWS प्रवर्गात असून त्याची किंमत ही 21 लाख 71 हजार 556 इतकी आहे. यात प्रवर्गात सर्वात महाग घराची किंमत ही 26 लाख 49 हजार 717 रूपये आहे. हे घर खारघर आणि कळंबोली इथं उपलब्ध आहे. तर बाकीची घरं ही तळोजा आणि द्रोणागिरी, घणसोली इथं आहेत.

LIG प्रवर्गातील घरांच्या किंमती ही जाहीर करण्यात आल्या आहेत. सर्वात महाग घर हे खारघरमध्ये 37 लाख 95 हजार 172 रूपये आहे. तर कळंबोली इथल्या घराची किंमत ही 37,47,158 रूपये इतकी आहे. तर तळोजा इथल्या घरांची किंमत ही 30 लाख 58 हजार 578 रूपये इतकी आहे. द्रोणागिरी इथल्या घरांची किंमत ही 30 लाख 17 हजार 682 रूपये आहे. तर घणसोली इथल्या घरांच्या किंमती या 36 लाख 72 हजार 505 इतकी आहे. अर्ज करताना EWS मध्ये मोडणाऱ्या व्यक्तींना 75,000 रूपये भरावे लागणार आहेत. तर LIG मध्ये मोडणाऱ्या व्यक्तींना दिड लाख रूपये भरावे लागणार आहेत.

नेमकी कशी आहे अर्ज प्रक्रिया? जाणून घ्या

ऑनलाईन अर्ज दाखल करण्यास 22 नोव्हेंबरला सुरूवात झाली आहे. अर्ज भरण्यास सुरूवात झाल्यानंतर अनेकींनी सिडकोने दिलेल्या  https://cidcofcfs.cidcoindia.com या वेबसाईटवर अर्ज दाखल करण्याच प्रयत्न केला. मात्र त्यात वारंवार एरर येत आहे. अर्ज दाखल होत नाही. त्यामुळे ग्राहकांना पहिल्या दिवशी नाहक त्रास सहन करावा लागला. 22 तारखेला रात्री उशिराही काही जणांना अर्ज दाखल करण्याचा प्रयत्न केला. पण त्यांना त्यात यश आले नाही असं काही जण सांगत आहेत. त्यामुळे ही वेबसाईट सुरळीत करावी अशी मागणी सिडको कडे केली जात आहे.


About Author

Rohit Shinde

Other Latest News