महाराष्ट्र सरकार कामाचे तास वाढविण्याच्या योजनेवर काम करीत आहे. काही दिवसांपूर्वी झालेल्या कॅबिनेट बैठकीत श्रम विभागाकडून याचा प्रस्ताव सादर करण्यात आला. प्रस्तावानुसार, सध्या कामाचे ९ तास आहेत, त्यात वाढ करून १० करण्यात येतील. सोबतच या प्रस्तावात महिलांना नाइट शिफ्टमध्ये काम करण्याचा उल्लेख आहे. महाराष्ट्राचे कामगार मंत्री आकाश फंडकर यांच्यानुसार या प्रस्तावावर काम सुरू केल आहे. अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही. मात्र हा प्रस्ताव आल्याने चर्चेला उधाण आलं आहे.
हा प्रस्ताव खासगी क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर लागू असेल. सध्या महाराष्ट्रात कामाचे ९ तास नियम आहे, जो वाढवून दहा तासांपर्यंत वाढविण्याचं काम सुरू आहे.

जर हा बदल अंमलात आणला गेला तर महाराष्ट्र दुकाने आणि आस्थापना (रोजगाराचे नियमन आणि सेवाशर्ती) कायदा, २०१७ मध्ये बदल करावे लागतील असे म्हटले जात आहे. हा कायदा दुकाने, हॉटेल्स, मनोरंजन केंद्रे आणि खाजगी व्यवसायांमध्ये कामाचे तास आणि रोजगाराच्या परिस्थिती निश्चित करतो.
कामाचे तास वाढविण्याऐवजी तंत्रज्ञानावर लक्ष द्यायला हवं
याचा परिणाम कर्मचाऱ्यांच्या कार्यक्षमतेवर आणि कामाच्या ठिकाणी इनोव्हेशवरही परिणाम होऊ शकतो. आज तंत्रज्ञानाच्या मदतीने अनेक इनोव्हेटिव्ह प्रकार तयार केले जाऊ शकतात. उत्पादकता वाढवण्यासाठी महाराष्ट्र सरकारने याचा विचार करायला हवा.
महिलांना नाइट शिफ्टवर सुरक्षा आणि पिकअप-ड्रॉप आवश्यक
महिलांच्या नाइट शिफ्टच्या प्रस्तावावर PHDCCI चे CEO रणजीत मेहता म्हणाले. महिलांनी रात्रपाळीत काम करण्यचा प्रश्न असेल तर त्यांना परवानगी द्यायला हवी. मात्र यासाठी त्यांना कामाचं ठिकाण अधिक सुरक्षित असायला हवं. सोबतच नाइट शिफ्ट करणाऱ्या महिलांना पिकअप आणि ड्रॉपची सुविधा अनिवार्यपणे मिळायला हवी.











