मुंबई लोकल ही शहराची जीवनरेखा मानली जाते. परंतु रविवारी होणाऱ्या मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागतो. रेल्वेच्या देखभाल आणि दुरुस्ती कामांसाठी हा मेगाब्लॉक आवश्यक असला तरी त्यामुळे अनेक गाड्या उशिरा धावतात किंवा रद्द होतात. प्रवाशांना लांब रांगा, गर्दी, उशीर आणि असुविधा यांचा सामना करावा लागतो. अनेक वेळा पर्यायी प्रवास व्यवस्था नसल्याने कामावर जाणारे आणि प्रवास करणारे लोक अडचणीत सापडतात.
उद्या रविवारी, 16 नोव्हेंबर रोजी देखील मुंबईत मेगाब्लॉक असणार आहे. रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर म्हणजेच मध्य, हार्बर आणि ट्रान्स-हार्बर मार्गावर रविवारी (30 नोव्हेंबर) मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. या मेगाब्लॉकमुळे गाड्यांच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. त्यामुळे मुंबई शहर आणि उपनगरांतील प्रवाशांना काहीसा त्रास सहन करावा लागणार आहे.

लोकलचा मेगाब्लॉक; प्रवाशांना मनस्ताप
मध्य, हार्बर आणि ट्रान्स-हार्बर मार्गावर रविवार, 30 नोव्हेंबर रोजी पाच तासांचा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. सीएसएमटी–विद्याविहार, पनवेल–वाशी आणि ठाणे–पनवेल मार्गांच्या सेवेला याचा मोठा फटका बसणार आहे. यामुळे अनेक गाड्या रद्द, तर काही गाड्यांचे मार्ग फास्ट लाईनवर वळवले जातील. मशीद बंदर, सॅण्डहर्स्ट रोड, चिंचपोकळी व करी रोड या स्टेशनवर धीम्या गाड्यांना थांबा मिळणार नाही. मात्र, काही विशेष सेवा चालवल्या जाणार आहेत.
मध्य रेल्वेतर्फे रविवारी, 30 नोव्हेंबर रोजी मुख्य मार्गासह हार्बर आणि ट्रान्स-हार्बर मार्गावर मोठा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. या ब्लॉकमुळे सीएसएमटी ते विद्याविहार तसेच पनवेल–वाशी मार्गावरील सेवांवर मोठा परिणाम होणार असून अनेक गाड्या रद्द राहतील किंवा मार्गांतरित केल्या जातील. साधारण पाच तास चालणाऱ्या या मेगाब्लॉकदरम्यान प्रवाशांना मोठ्या प्रमाणावर गैरसोयींचा सामना करावा लागू शकतो. काही महत्त्वाच्या स्टेशनवर या कालावधीत धीम्या गाड्यांचा थांबा राहणार नसल्याने प्रवासाचे नियोजन बदलण्याची आवश्यकता भासू शकते.
मध्य रेल्वे – मेन लाईन (सीएसएमटी ते विद्याविहार)
मुख्य मार्गावर रविवारचा मेगाब्लॉक सकाळी 10.55 वाजता सुरू आहे. हा मेगाब्लॉक दुपारी 3.55 वाजेपर्यंत चालणार आहे. या काळात अप आणि डाउन धीम्या मार्गावरील गाड्या उपलब्ध राहणार नाहीत. त्यामुळे सीएसएमटीहून सुटणाऱ्या 10.48 ते 4.45 या वेळेतल्या डाउन धीम्या गाड्या फास्ट लाईनवर वळवण्यात येतील. या गाड्या भायखळा, परळ, दादर, माटुंगा, सायन आणि कुर्ला या स्थानकांवर थांबतील आणि विद्याविहारनंतर पुन्हा धीम्या मार्गावर येतील.
अप दिशेकडून येणाऱ्या धीम्या गाड्या सकाळी 10.19 ते दुपारी 3.52 या काळात अप फास्ट लाईनवर चालवण्यात येणार आहेत. या गाड्या कुर्ला, सायन, माटुंगा, दादर, परळ आणि भायखळा येथे थांबतील. मशीद बंदर, सॅण्डहर्स्ट रोड, चिंचपोकळी आणि करी रोड स्टेशनवर या कालावधीत कोणतीही धीमी ट्रेन थांबणार नाही. काही आठवड्यांपूर्वी झालेल्या मेगाब्लॉकदरम्यानही हीच परिस्थिती निर्माण झाली होती, ज्यामुळे अनेक प्रवाशांना प्रचंड त्रास सहन करावा लागला होता.
हार्बर लाईन – पनवेल ते वाशी विभाग
हार्बर मार्गावर पनवेल–वाशी मधील अप आणि डाउन सेवांवर मेगाब्लॉकचा थेट परिणाम जाणवणार आहे. हा ब्लॉक सकाळी 11.05 ते दुपारी 4.05 या वेळेत राहील. या काळात पनवेलहून 10.33 ते 3.49 या वेळेत सुटणाऱ्या अप हार्बर गाड्या पूर्णपणे रद्द करण्यात आल्या आहेत. त्याचप्रमाणे सीएसएमटीहून 9.45 ते 3.12 या वेळेत बेलापूर/पनवेल दिशेने जाणाऱ्या डाउन गाड्या देखील रद्द राहतील. त्यामुळे सीएसएमटी ते बेलापूर/पनवेल दरम्यानची सर्व सेवा या पाच तासांत बंद राहणार आहे.
ट्रान्स-हार्बर लाईन – ठाणे ते पनवेल
ट्रान्स-हार्बर मार्गावर ठाणे–पनवेल दरम्यानचा मेगाब्लॉक अप मार्गावर 11.02 ते 3.53 आणि डाउन मार्गावर 10.01 ते 3.20 या वेळेत घेण्यात येणार आहे. या कालावधीत ठाणे–पनवेल गाड्या रद्द असतील. मात्र ठाणे–वाशी/नेरूळ मार्गावरील सेवा सुरळीत सुरू राहतील.
वेळापत्रक पाहून प्रवास करा!
या मेगाब्लॉकच्या काळात प्रवाशांनी वेळापत्रक पाहूनच प्रवास करावा, असे आवाहन सातत्याने रेल्वे प्रशासनाकडून केले जात असते. बऱ्याचदा अनेक गाड्या उशिरा येतात, विलंब होतो अशावेळी प्रवाशांनी पर्यायी प्रवासाच्या साधनांचा वापर करावा. शिवाय पावसाचे दिवस असल्याने आणखी काळजी घेणे आवश्यक ठरते.











