मुंबई लोकलने (Mumbai Local Train) प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे.. मुंबईच्या पश्चिम रेल्वे लाईन वर सात नवीन स्थानके उभारण्यात येणार आहेत. विरार ते डहाणू मार्गावर येत्या दोन वर्षांत सात नवी स्थानकं उभारण्यात येणार आहेत. सध्या विरार ते डहाणू मार्गावर नव रेल्वे स्थानके आहेत आता यामध्ये आणखी सात स्थानके उभारण्यात आल्यानंतर लोकलने प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा प्रवास आणखी सोप्पा होणार आहे.
या नवीन रेल्वे प्रकल्पाची अंमलबजावणी मुंबई रेल्वे विकास महामंडळ (MMRDA) करणार असून जून 2027 पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट MMRDA ने ठेवलं आहे. मुंबईकरांचा प्रवास सोपा करणाऱ्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचा एकूण खर्च अंदाजे 3578 कोटी रुपये इतका असून, यामध्ये मार्गाचं चौपटीकरण आणि नव्या स्थानकांची उभारणी समाविष्ट आहे.

सध्या 7 रेल्वे स्टेशन – Mumbai Local Train
पश्चिम लाईनवरील विरार ते डहाणू हा रेल्वे मार्ग जवळपास 64 किलोमीटर अंतराचा आहे सध्या या मार्गावर वैतरणा, सफाळे, केळवे रोड, पालघर, उमरोली, बोईसर आणि वाणगाव अशी नऊ प्रमुख स्थानके आहेत. परंतु लोकलने प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या संख्येच्या तुलनेत ही स्थानके अपुरी पडत आहे. त्यामुळे विरार ते डहाणू या रेल्वे मार्गावर आणखी स्थानके उभारण्यात यावी अशी मागणी मागील अनेक दिवसांपासून चर्चेत आहे. अखेर MMRDA ने याबाबत निर्णय घेत सात नवीन रेल्वे स्थानके उभारण्याच्या दिशेने पाऊल टाकल आहे. (Mumbai Local Train)
कोणकोणत्या ठिकाणी स्थानके उभारणार –
1 वाधीव
2 सरतोडी
3 माकूणसर
4 चिंतूपाडा
5 पांचाली
6 वांजरवाडा
7 बीएसईएस कॉलनी
या 7 नवीन रेल्वे स्थानकांच्या उभारणीसाठी आवश्यक तांत्रिक कामांना सुरुवात झाली असून, सध्या एकूण प्रकल्पाचे 41 टक्के काम पूर्ण झाल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. या स्थानकांमुळे विरार ते डहाणू दरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा प्रवास अधिक सोपा आणि आरामदायी होणार आहे. तसेच वाढती गर्दी आटोक्यात येण्याची शक्यता आहे.











